आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माेदी पंतप्रधान हे भारताचे भाग्य! (प्रकाश जावडेकर)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचे व्यक्तीत्वच असे अाहे की, त्यांच्यासाेबत काम करण्याचा अानंद मिळताेच. विकासासाठी झपाटलेले माेदी स्वत: काम करतात अाणि सहकाऱ्यांकडूनही करवून घेतात. पक्षसंघटनेचे काम करतानापासून त्यांची -माझी मैत्री अाहे. ते संघाचे काम करायचे, पुण्यातील लक्ष्मणराव ईनामदार यांच्या कार्याचा त्यांच्यावर खूप माेठा प्रभाव हाेता. तेव्हा मी युवा मोर्चाचे काम करीत हाेताे. यानिमित्ताने पुण्यात खूपदा भेटी व्हायच्या. संघटनेतील किंवा सरकारमधील काम असाे अापल्याला काय करायचे अाहे हे ध्येय निश्चित असल्यामुळे माेदीजींसाेबत काम करताना कधीच दडपण अाले नाही – येत नाही. स्वातंत्र्यानंतर देशात शिक्षण पाेहचले असले तरी गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अद्यापही अभाव अाहे. यावर मात करीत जगात भारत पहिल्या स्थानावर नेण्याचे माेदींचे स्वप्न पूर्ण हाेणार यात शंका नाही. शनिवारी त्यांचा वाढदिवस हाेता. मला निश्चित खात्री अाहे भारताच्या नशीबात असे पंतप्रधान दीर्घकाळ मिळाले तर भारतामध्ये चांगला बदल झालेला अापल्याला दिसेल.
आतापर्यंत मी पाच खात्यांची जबाबदारी सांभाळली, माहिती व प्रसारण, वन व पर्यावरण, माहिती व नभाेवाणी, संसदीय कार्य अाणि अाता शिक्षण खाते अाहे. प्रत्येक खात्याविषयी त्यांची जबरदस्त दूरदृष्टी व स्पष्ट याेजना अाहे. नुकतेच राष्ट्रपती भवनात त्यांची माझी भेट झाली. ब्रह्मदेशचे राष्ट्रपती अाले हाेते. मी माेदीजींना म्हणालो, तुम्ही सुचविल्याप्रमाणे रिसर्च अाणि इन्हाेवेशन यासाठी पुढाकार घेतला अाहे. उच्च शिक्षणामध्ये शाेध अाणि शाेधकार्यासाठी प्राेत्साहन देण्याची माेठी याेजना सुरु केली त्याचे लाेक काैतुक करतात. तेव्हा ते म्हणाले, तरीसुद्धा अापण रिसर्चला अधिक पैसा दिला पाहिजे, याचाच अर्थ या नेत्याच्या मनात पक्के अाहे की, अापल्याला कुठे जायचे अाहे अाणि देश कशात मागे पडत अाहे. गेल्या ७० वर्षात अापण तळागाळापर्यंत शिक्षण पाेहचवले असले तरी गुणवत्तेवर अाधारीत शिक्षणाचा वेगाने प्रसार झाला नाही. जिथे गुणवत्ता उच्चशिक्षण उपलब्ध अाहे अशा अायअायटी अाणि अन्य संस्थांमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांना शोधकार्यासाठी परदेशात जावे लागते अशा विद्यार्थ्यांसाठी येथे निधी, प्राेत्साहन, सुविधा अाणि स्वातंत्र्य देण्याचा माेदींनी चंग बांधला अाहे.
लहान मुलांना कसे शिकवावे इथपासून ते विचार करतात. स्वत: गरीबी अाणि खेड्यात वाढल्याने व जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकल्यामुळे गुजरातमध्ये माेदींनी शिक्षण क्षेत्रात नव-नवे उपक्रम सुरु केलेत. ‘पढे भारत- बढे भारत’ही त्यांची दृष्टी अाहे. त्यामध्ये गावात असलेली पुस्तके मुलांपर्यंत शाळेमध्ये पाेहचावी, पाठ्यक्रमाशिवाय त्यांनी एकतरी पुस्तक वाचावे; त्यावर स्पर्धा घ्यायच्या असा त्यांचा मानस आहे.
मुलांना वाचनास प्राेत्साहन द्यायचे, वाचनामुळे बहुश्रुतता येते, तेव्हाच तो पूर्ण नागरिक हाेताे हे माेदी जाणून अाहेत. शिक्षकांचाही उत्साह कसा वाढेल पाठ्यपुस्तके, अभ्यासक्रम अाणखी सकस कसा हाेईल अाणि सगळ्या पातळीवर गुणवत्ता वाढवायची असेल तर समाजाचाही त्यामध्ये सहभाग असावा या मताचे माेदी अाहेत.

काैशल्यासाेबतच जीवनाची मुल्ये देऊन चांगला नागरिक घडला पाहिजे हे शिक्षणाचे शेवटचे ध्येय अाहेे. असे चांगले नागरिक घडले तरच देश चांगला घडताे. त्यामुळे यात दर्जेदार बदल करण्याची त्यांची दृष्टी अाहे. देशात २७ काेटी विद्यार्थी ‘केजी ते पीजी’ पर्यंत शिक्षण घेतात त्यांना घडविण्यासाठी ८५ लाखांपेक्षा अधिक शिक्षक विद्यादानाचे पवित्र कार्य करीत अाहेत. शिक्षण अधिक चांगले व्हावे यासाठी अाम्ही शिक्षकांशी संवाद साधणार अाहाेत.
शब्दांकन : विकास झाडे
बातम्या आणखी आहेत...