आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुतळ्याचे दहन करून उन्हाळ्याचे भाकित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वित्झर्लंडमध्ये नुकताच ‘सक्सलेउतेन’ हा उत्सव साजरा करण्यात आला. यात शेकडो घोडेस्वार सहभागी होतात. झुरिच राज्यातील रस्त्यांवर घोड्यांची शर्यत पार पडते. त्यानंतर एका मैदानावर बर्फाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले जाते. हा पुतळा म्हणजे हिवाळ्याचे प्रतीक मानला जातो.   

पुतळ्याच्या वरील भागात फटाके लावलेले असतात. पुतळ्याचे दहन लवकर झाले तर यंदा उन्हाळा चांगला जाईल, असे मानले जाते. या वर्षी ९ मिनिटे ५६ सेकंदांत पुतळ्याचे पूर्ण दहन झाले. मागील वर्षी  ४३ मिनिटे ३४ सेकंद लागले होते. तेव्हा नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते; पण  उन्हाळा साधारण होता. २००३ मध्ये पाच मिनिटे ४२ सेकंद एवढ्या कमी वेळेत पुतळा जळाला. हा सर्वात कमी वेळेचा विक्रम आहे. त्या वर्षी तेथे उन्हाळा जास्त जाणवला. उन्हाळा चांगला असला तर स्वित्झर्लंडमध्ये पर्यटनाचा व्यवसाय चांगला होतो. साधारण उन्हाळा असला तर पर्यटकांची संख्या वाढते.  
-thelocal.ch
बातम्या आणखी आहेत...