आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मलेरिया प्रतिबंधक नवे अाैषध मानवाला बनवणार केमिकल हत्यार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मलेरिया पसरवणाऱ्या अॅनॉफिलीस जातीच्या डासांचा खात्मा करणे एवढे महत्त्वाचे आहे का, की यासाठी माणसांनीच काही दिवस सतत औषध घेऊन आपले रक्त या डासांच्या आरोग्यासाठी विषारी बनवावे? काही संशोधकांनी असे द्राविडी प्राणायाम करण्याचे प्रयोग करण्याचे सल्ले दिले आहेत. त्यांच्या मते, मलेरियाग्रस्त भागातील लोकांना आयव्हरमेक्टिन हे औषध द्यावे. यामुळे लोकांचे मलेरियाच्या डासांपासून अप्रत्यक्षरीत्या संरक्षण होईल. हे औषध मलेरिया पसरवणाऱ्या विषाणूविरोधात काम करत नाही, तर माणसाच्या शरीरातील रक्त डासांसाठी अपायकारक करण्याचे काम करते. संशोधकांचा दावा असा आहे की, एखाद्या गावातील जास्तीत जास्त लोकांनी हे औषध घेतल्यास परिसरातील अॅनॉफिलिस डासांच्या संख्येवर परिणाम होईल. परिणामी या क्षेत्रात मलेरियाचा प्रादुर्भाव कमी होईल.

आयव्हरमेक्टिन या औषधाचा वापर फिलेरियासिस, अंधत्व, स्कॅबीज यांसारख्या अनेक व्याधींवर उपचारात केला जातो. मात्र, निरोगी लोकांना डास मारण्यासाठी औषध देण्याच्या या क्लृप्तीची थट्टा केली जात आहे. आयव्हरमेक्टिनचा प्रभाव शरीरात फार काळ टिकत नाही. त्यामुळे डासांवरही याचा सतत परिणाम होईल, असे होणार नाही. मेसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे डॉ. रॉबर्ट लँगर आणि ब्रिघम वुमन्स हॉस्पिटलचे डॉ. जियोवानी ट्रेव्हर्सो या संशोधकांना या प्रयोगात आणखी बदल करायचे आहेत.

या दोन संशोधकांनी आयव्हरमेक्टिनमध्ये पॉली ई- केप्रोलेक्टोन (पीसीएल) मिसळून नवे औषध तयार केले. हे औषध १४ दिवस पोटातील आम्लापासून सुरक्षित राहू शकते. औषधाची गोळी चार सेंटिमीटर आकारात चांदणीच्या आकारात ठेवली. त्यामुळे ती आतड्यांतून लगेच बाहेर पडणार नाही. गिळण्यास सोपी जावी म्हणून जिलेटिनच्या कॅप्सूलचे त्यावर आवरण आहे. या औषधामुळे पचनक्रियेवरही परिणाम होत नाही. हळूहळू विरघळणारी ही गोळी १५ दिवसांनी शरीरातून बाहेर पडते. पुढील वर्षी या गोळीचा प्रयोग मानवी शरीरावर केला जाऊ शकतो.
बातम्या आणखी आहेत...