आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वधूसाठी प्रिन्सेस निलोफर कलेक्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ्रत्येकाचा जन्म राजघराण्यात होत नाही. परंतु अंतरंगात असलेल्या राजकुमारीला साकार करण्यासाठी डिजायनर अनुश्री रेड्डी यांनी नुकतेच ‘लॅक्मे  फॅशन वीक’ या शोदरम्यान विंटर फेस्टिव्ह २०१७ मध्ये आपल्या डिझायनर ड्रेसेसचे सादरीकरण केले.  पारंपरिक जरदोशीसोबत क्लीन-कट कंटेम्पररी सिल्हूट सध्याच्या घडीला वधूंसाठी उपयोगी आहे. विंटर फेस्टिव्ह कलेक्शनमध्ये नवाबी काळ ते मोगल सत्ताकाळातील गाभा याचा अनोखा संगम त्यांनी दाखवला आहे. जे अालंकारिक पद्धतीने डिझाइन केले आहे. या ड्रेसवरील लेहंगा हातांच्या कलाकुसरीने सजवला आहे. त्यावर विविध रंगात पिची पिंक, बर्न्ट ऑरेंज, सन्सेट यलो आणि  गोल्डन या रंगात होते.  जे कापड अधिक जिवंतपणा दाखवते त्यावर निलोफर कलेक्शनसाठी हातांनी विनलेलेे सिल्क, ड्रिमी आॅरेंज आिण नैसर्गिक मुलायम कापड अंगावर शोभून दिसणार आहे. 
 
लेबलला क्लासिक फुलांमध्ये नवाबी पद्धतीने मांडणी असून ते कलेक्शन स्क्रॉलप डिटेल्स, फ्लर्टी, फ्रिल्स, क्रिस्प सिल्हट्स, रफल डिटेलिंग, डॉन्टिंग वॉल्यूम आणि स्लिक लेयरिंग केंद्रित केले आहे.  या हंगामात अनुश्री रेड्डीने एक मेन्सवेअर लाइनही लाँच केली. हे कलेक्शन मॉडर्न पुरुषांसाठी आहे.  रिच हंॅड-अोव्हन टेक्सटाइल, इंटेन्सिव्ह हंॅडमेड डिटेलिंगच्या सजावटीवर लक्ष केंद्रित केले आहे. कॅटवॉकसाठी हैदराबादच्या ब्रँडने निलोफरच्या संकल्पनेवर आधारित वायलिन आणि ड्रम यांचे म्युझिक दाखवले आहे. अनुश्री सांगतात की,  मी केलेल्या अभ्यासातून डिझाइनमध्ये ज्या चुका होत्या त्या दूर केल्या आणि त्याला पारंपरिक लूक देत भारतीय पद्धतीने सादर केले आहे. मला आशा आहे की, मी तयार केलेले कलेक्शन हे क्लासिक कपडे वापरणाऱ्यांना पसंतीस उतरेल. नर्गिस फाकरी यांनी सांगितले की, अनुश्रीने कपड्यांचे डिझाइन करताना खूप मेहनत घेतली आहे. नववधूला हा निलोफर डिझाइनचा पोशाख अतिशय आनंददायी वाटणारा असाच आहे.  

नर्गिस एक शोस्टॉपर 
अभिनेत्री नर्गिस फाकरी ऊर्फ पिवळ्या फुलांचे आणि एम्ब्राॅयडरी स्क्रॅप जर्दाेशी लेहंग्यावरील रॅम्प शो ट्रॉपरमध्ये दिसतात. त्यांनी एम्ब्रॉयडरी वर्क केलेले ब्लाऊज घातले होते.
 
 
अस्मिता अग्रवाल, फॅशन लेखिका,
बातम्या आणखी आहेत...