Home | Divya Marathi Special | prithviraj chavan appreciatate narendra modi

पृथ्वीराज यांच्या मोदी कौतुकाने वाद सुरू

दिव्य मराठी नेटवर्क (मुंबई) | Update - Jun 04, 2011, 12:55 PM IST

करायला जावे एक आणि होते दुसरेच, अशीच पृथ्वीराज चव्हाण यांची गत झाली आहे. त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या कामाचे कौतुक केले खरे; पण त्याचा उलट परिणाम त्यांनाच भोगावा लागत आहे.

  • prithviraj chavan appreciatate narendra modi

    करायला जावे एक आणि होते दुसरेच, अशीच पृथ्वीराज चव्हाण यांची गत झाली आहे. त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या कामाचे कौतुक केले खरे; पण त्याचा उलट परिणाम त्यांनाच भोगावा लागत आहे. 'माझ्या म्हणण्याचा जो अर्थ तुम्ही घेतलात तसे मला म्हणायचे नव्हते. मी फक्त विकासात्मक कामांबाबत बोललो होतो, असे पृथ्वीराज यांना वारंवार सांगावे लागत आहे. पृथ्वीराज यांना देशमुख आणि अशोक चव्हाणच नाही, तर राष्ट्रवादीच्या अजित पवार यांनीही आपल्या निशाण्यावर घेतले आहे.

    काही दिवसांपूर्वी चव्हाण यांनी गुजरातच्या विकासकामांचे कौतुक केले, त्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांचा पारा चढला आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सरकार चालवत आहे. मोदी यांच्या कौतुकामुळे सर्व विरोधकांकडून एकाच आवाजात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात तक्रारी यायला सुरुवात झाली. विलासराव देशमुखांचा गट ङ्क्षकवा अशोक चव्हाण यांचा गट, सर्वांनीच नरेंद्र मोदी यांच्या कौतुकावर आक्षेप घेणे सुरू केले आहे. सरकारमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची युती असली तरी राष्ट्रवादीला काँग्रेसला विरोध करण्यास कारणच मिळाले. मुख्यमंत्र्यांनी मोदी यांचे का कौतुक केले, असा प्रश्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही पडला असावा. पृथ्वीराज यांना सध्या आपली खुर्ची सुरक्षित असल्याची खात्री आहे, त्यामुळे त्यांच्या पदाला धक्का बसावा यासाठी प्रयत्न करणा:यांना काहीही यश आलेले नाही. मात्र, त्यांना ही भीती मात्र कायम आहे की, अशी युती किती दिवस टिकणार आहे?

Trending