आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२५ टक्के गर्भवती महिलांमध्ये समस्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
थायराॅइड संदर्भातील सर्वात माेठी समस्या थायराॅइड हार्मोन्सचे  असामान्य उत्पादन अाहे. याला हायपरथायरोडिज्म म्हणून अाेळखले जाते.  गर्भवती महिलांसाठी हा अाजार धाेकादायक असताे. कारण गर्भावस्थेतच भ्रूणाचा विकास हाेताे अाणि भ्रूणाची वाढ अाईच्या थायराॅइड हार्मोन्समुळे हाेते. प्रसूती झाल्यावर विकास व वृद्धी थायराॅइडमुळे नियंत्रित हाेते.  

२५ टक्के महिलांना गर्भावस्थेच्या सहाव्या अाठवड्यापर्यंत हायपरथायरोडिज्म झालेला असताे. गर्भनळी अाणि भ्रूणाच्या विकासासाठी थायराॅइड हार्मोन्सचा स्राव गरजेचा अाहे.
 
गर्भावस्थेदरम्यान अाई व भ्रूणाची मेटोबाॅलिक गरजेच्या पूर्तीसाठी स्रावचा स्तर ५० टक्के वाढणे गरजेचे अाहे. अाईचे शरीर गरजेनुसार पुरेसा हार्माेन्सचा स्राव नाही करू शकले तर गर्भपात, वेळेपूर्वी प्रसव, बाळाचे वजन कमी असणे व त्यानंतरची समस्या वाढू शकते. 

- काय असते हायपरथायरोडिज्म- याचे सर्वात माेठे कारण आॅटोइम्यून अाजार, चुकीचे अाैषध घेणे अाणि लिथियमचा वापर करणे अाहे. परिवारात थायराॅइडचा अाजार काेणाला असेल तर ते ही जाेखमीचे असते.  हायपरथायरोडिज्ममुळे मासिक धर्म सामान्य नसताेे. तसेच  गर्भधारणेतही अडचणी येतात.  

- लक्षणे : तुम्हाला थकवा वाटत असेल, तुमचे केस अाणि त्वचा काेरडी असेल, थंड तापमानाबाबत संवेदनशील असाल अाणि मासिक धर्म अनियमित असेल तर हे हायपरथायरोडिज्मचे लक्षणे अाहेत.

- प्रभाव : वाढलेले टिश्यू, वजनातही वाढ, मांसपेशीत तणाव तसेच त्या सातत्याने दुखणे, हृदयाचे ठाेके सामान्यांपेक्षा कमी असणे, वांझाेटेपणा, मानसिक आळस अाणि कंठाच्या खाली असलेल्या  थायराॅइडमध्ये सूज (गलगंड) हे याचे प्रभाव असू शकतात.

ही पथ्ये गरजेची
सोयाचा उपयोग :
सोया आयसोफ्लेवन्सचा वापर जास्त केल्यास हायपरथायरोडिज्म, गलगंड किंवा नोड्यूल्स खराब हाेऊ शकते. 

आयोडीनचा वापर कमी करा : आयोडीनचा वापर करायचा असेल तर खूप जास्तही करू नका अाणि कमीही करू नका.

धूम्रपानापासून दूर राहा : धूम्रपानामुळे थायराॅइडवर परिणाम हाेतात. कारण यामुळे  हार्मोनचा स्रवण प्रभावित हाेताे. यामुळे वांझाेटेपणा येऊ शकताे.

तणाव कमी करा : प्रभावी तंत्रज्ञानाचा वापर करून मेंदू अाणि शरीरावरील तणाव कमी केल्यास थायराॅइडपासून बचाव करता येताे.
- डॉ. तनू बत्रा, आईव्हीएफ एक्स्पर्ट, जयपूर
बातम्या आणखी आहेत...