आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

त्वचेप्रमाणे केसांचेही रक्षण्‍ा करा सनस्क्रीन क्रीमने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जीवनशैलीतील बदल केसांसाठी अपायकारक ठरत आहेत. केस गळणे, पांढरे होणे, पातळ होणे या सर्वसाधारण समस्या आहेत. आपल्याला लांब, सुंदर केस हवे असतील तर पुढील काही गोष्टी लक्षात ठेवा...


बराच वेळ उन्हात राहिल्याने त्वचेला अपाय होतो. हे ऊन केसांनाही तितकेच घातक असते. खासकरून वरवरच्या केसांची जास्त हानी होते. उन्हामुळे केसांमधील आर्द्रता कमी होऊ लागते. केस कोरडे होतात. चमक निघून जाते. हे टाळण्यासाठी त्वचेप्रमाणेच केसांवरही सनस्क्रीन स्टायलिंग क्रीमचा वापर करा. बाहेर जाण्यापूर्वी केसांना क्रीम लावल्यास आर्द्रता टिकून राहील. केस मजबूत होतील. हेअरकटची निवड करताना आपला फेस-कट लक्षात घ्या.
फेस-कटला अनुकूल हेअरकट केल्यास ओव्हर ऑल लूक बदलतो. त्वचेप्रमाणेच केसांनाही व्हिटामिन ए, बी, सी, ई, कॅल्शियम, मॅग्नेशियमयुक्त शाम्पू, कंडिशनर आणि हेअर मास्क लावा. शाम्पूमध्ये सल्फेटचे प्रमाण कमी असावे. सल्फेटमुळे केसांमधील नैसर्गिक तेल कमी होऊ लागते.


पोनीटेल बांधल्यास यूथफुल लूक मिळतो. आपण फ्रेश दिसता. योग्य उंचीवर पोनीटेल बांधल्यास फेस-लिफ्ट मिळतो. हार्मोन्समधील बदलांमुळेही केस झडतात. आपल्याला केसांच्या कोरडेपणाची समस्या जास्त सतावत असेल तर सोयाबीन किंवा कॉटनसीड आॅइल आणि ग्लिसरीनयुक्त हायड्रेटिंग कंडिशनरचा वापर करावा. त्यातून केसांना योग्य पोषण मिळेल.