Home »Divya Marathi Special» Protection Lear From Space Radiation

अंतराळ किरणोत्सर्गापासून बचावासाठी पृथ्‍वीचे कवच

दिव्य मराठी नेटवर्क | Jan 10, 2013, 00:00 AM IST

  • अंतराळ किरणोत्सर्गापासून बचावासाठी पृथ्‍वीचे कवच


अंतराळात प्रत्येक ठिकाणी किरणोत्सर्गाचा धोका असतो. आपण धुळीच्या लोटांत उभे असल्यावर छोटे छोटे कण त्वचेवर चिकटतात. याचप्रमाणे अंतराळात किरणोत्सर्गाची प्रक्रिया घडते. फरक एवढाच की, धुळीचे कण त्वचेवर फक्त चिकटतात; पण किरणोत्सर्गाद्वारे किरण थेट त्वचेत प्रवेश करतात.

गेल्या आठवड्यात युनिव्हर्सिटी ऑफ रोचस्टर मेडिकल सेंटरतर्फे गॅलेक्टिक कॉस्मेटिक रेडिएशनच्या दुष्परिणामांवरील संशोधन प्रकाशित करण्यात आले. यातील अहवालानुसार मंगळ मोहिमेवर काम करणा-या अंतराळवीरांमध्ये अल्झायमरचे प्रमाण वाढले आहे. तेथील गॅलेक्टिक कॉस्मेटिक रेडिएशन्स प्रवाशांसाठी खूप धोकादायक असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. सुपरनोव्हाच्या विभाजनातून उत्पन्न झालेल्या किरणोत्सर्गाच्या कणांपैकी 90 टक्के हायड्रोजन अणूंपासून बनलेले असतात. त्यांचा वेग प्रकाशाएवढा असतो.

आपली पृथ्वीच आपल्याला या किरणोत्सर्गापासून वाचवते. हे घटक पृथ्वीकडे येत असतात तेव्हा गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे ते विरुद्ध दिशेने ढकलले जातात. त्यामुळे ते वातावरणात प्रवेश करू शकत नाहीत. जे कण वातावरणात प्रवेश करतात, ते कोणत्या ना कोणत्या घटकाच्या संपर्कात येतात आणि त्यांचे विघटन होते. त्यामुळे पृथ्वीपर्यंत येतानाच त्यांची शक्ती क्षीण होते. जवळपास नसल्यातच जमा होते. नासाच्या स्पेस रेडिओबायोलॉजी प्रोग्रामचे डायरेक्टर फ्रान्सिस क्युसिनोटा यांच्या मते, आपल्या वातावरणात काम करणा-या अंतराळवीरांना यामुळे जास्त फायदा होत आहे. मून मिशन सोडले तर इतर अंतराळ प्रवासी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रातच राहतात. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन या कक्षेबाहेर होते; पण अंतराळ प्रवाशांवर गॅलेक्टिक कॉस्मेटिक रेडिएशन्सचे दुष्परिणाम झाले नाहीत. मर्यादित वेळेतच ते या किरणोत्सर्गाच्या संपर्कात आले होते. एका वर्षासाठी ते थांबले होते तेव्हा काही दुष्परिणाम दिसून आले होते.

क्युसिनोटांच्या संशोधनानुसार, जे प्रवासी अंतराळात बराच वेळ राहिले त्यांना मोतीबिंदू झाल्याचे आढळून आले. तसेच कर्करोगाची शक्यताही वाढली; पण यापेक्षा जास्त एचझेडई घटकाची चिंता क्युसिनोटांना सतावत आहे. अंतराळातील प्रवाशांच्या रक्ताचे नमुने गॅमा किरणांच्या मदतीने तपासण्यात आले. त्यात आढळून आले की, ज्या पेशींना हे कण स्पर्शही करत नाहीत, त्यांनाही धोका संभवू शकतो. अध्ययनानुसार अंतराळवीरांवर किरणोत्सर्गाचे गंभीर परिणाम झाले नाहीत. किरणोत्सर्गाबाबत आणखी ब-या च गोष्टी आहेत, ज्यांच्या शोधात सध्या शास्त्रज्ञ आहेत.

boingboing.net

Next Article

Recommended