आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वॉलमार्टविरोधात चीनमध्ये आंदोलन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनमध्ये अनेक जागतिक कंपन्यांनी रेस्टॉरंट, रिटेल स्टोअर्स, शोरुम्स सुरू केले आहेत. या आस्थापनांवर बहुतांश स्थानिक लोकच काम करतात. शेनझेन शहरात वॉलमार्टच्या रिटेल स्टोअरविरोधात हजारो कर्मचारी एकवटले आहेत. त्यांनी वीचॅटच्या माध्यमातून कंपनीविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे.
कंपनीत काम करताना चांगले वातावरण असावे तसेच वेतनही चांगले असावे, अशी त्यांची मागणी आहे. स्थानिक न्यायालयात कर्मचाऱ्यांनी थकलेले वेतन देण्यासाठी खटला दाखल केला आहे. कॉर्नेल विद्यापीठातील कर्मचारी कायद्याचे अभ्यासक एली फ्रॅडमन म्हणतात, चीनमधील वॉलमार्टचे कर्मचारी कामाच्या वेळांमुळे त्रस्त आहेत. मर्यादेपेक्षा काम दिल्याने त्यांच्यावर अतिताण येतो. त्यामुळेच कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर ही मोहीम उघडली आहे. येथील माजी कर्मचारी वांग हे या मोहिमेचे नेते आहेत. ते कस्टमर सर्व्हिस रिप्रेझेंटेटिव्ह होते. त्यांना दोन वेळा कंपनीतून काढण्यात आले. आज त्यांच्यासोबत २० हजारांहून अधिक कर्मचारी जोडलेले आहेत. उत्तम वेतन देण्याचे दावे करत वॉलमार्टने १९९६ मध्ये चीनमध्ये पदार्पण केले होते. मात्र, हे आश्वासन पाळण्यात कंपनी अपयशी ठरली आहे.
}asiabizz.com
बातम्या आणखी आहेत...