पुण्यातील पॉश सोसायटी. बहुमजली पाच इमारती. समोर गार्डन, क्लब हाऊस, प्ले ग्राऊंड सारख्या सुसज्ज सोईसुविधा. उच्चभ्रू लोकांची आधुनिक वसाहत. सगळ्यांचे आलिशान बंगले वजा फ्लॅट. सकाळी 10 ते 11 च्या सुमारास ऑफिसात जाणाऱ्या साहेबांच्या कारची गर्दी झालेली. यावेळी गच्चीवरून काहीतरी कोसळल्याचा जोरदार आवाज होतो. गोंगाट करणारी गाड्यांची गर्दी क्षणात शांत होते. बाल्कनितून माना डोकावू लागतात. फ्लॅट नंतर 512 मध्ये राहणारी महिला आणि तिची 13 वर्षांची मुलगी जमिनीवर निपचित पडलेली. दोघींभोवती रक्ताचा सडा सांडलेला. देहांमध्ये जराही जीव नाही. बघणाऱ्यांना चांगलाच धक्का बसलेला. कुजबुज सुरू झालेली. लगेच पोलिस स्टेशनला फोन जातो. तिच्या मिस्टरांना कळवले जाते.
पोलिस येतात. सोपस्कर पार पाडतात. मृतदेह उचलून नेले जातात. काही तासांनी मुंबईला नोकरीला असलेले मिस्टर सोसायटीत येतात. जोरदार हंबरडा फोडतात. भावना मोकळ्या होतात. रक्त बघून त्यांची शुद्ध हरपते. त्यांना रुग्णालयात दाखल केले जाते. दिवसभर सोसायटीत नानाविध चर्चांना उधाण येते. आत्महत्या की हत्या, या दोनच शक्यता गृहित धरल्या जातात.
मृत्यूचे नेमके कारण समजण्यासाठी पोलिस मृतदेहांवर पोस्टमॉर्टम करतात. डॉक्टरांचा अहवाल वाचून पोलिसांना धक्का बसतो. 13 वर्षांच्या मुलीच्या पोटात गर्भ असतो. एवढ्या लहान वयातील मुलगी कशी काय गर्भवती राहिली असावी, असा प्रश्न छळू लागतो. आणखी एक बाब पोलिसांना खटकत असते, ती म्हणते दोन्ही मृतदेहांच्या कपाळावर हळदी-कुंकु आणि हातांमध्ये छोटासा अॅल्युमिनिअमचा त्रिकोण असतो.
या दोघींनी आत्महत्या केली असावी....की त्यांना कुणी ढकलले असावे...की त्यांच्या मृत्युमागे काही वेगळेच कारण असावे...कोण असेल त्यांच्या मृत्यूला जबाबदार... वाचा पुढील स्लाईडवर
(फोटो सौजन्य- गुगल. ही स्टोरी काल्पनिक आहे. साधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा.)