आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: पुण्याजवळ इंद्रायणीत वाहुन गेलेली तवेरा सापडली, दोघे अद्याप बेपत्ता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत आहे. यात गेल्या मंगळवारी आळंदी परिसरातील नव्या पुलावरून एक तवेरा गाडी वाहून गेली होती. यावेळी गाडीत दोन व्यक्ती होत्या. परंतु, त्यानंतर गाडी आणि या बेपत्ता व्यक्तींचा शोध लागलेला नव्हता. आज (शुक्रवार) या नदीतून तवेडा गाडी बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र बेपत्ता व्यक्तींबाबत अजूनही काही माहिती मिळालेली नाही.

काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने इंद्रायणी नदीचे पाणी आळंदी परिसरातील नव्या पुलावरून वाहत होते. यावेळी एक तवेरा पुलावरून जात होती. दरम्यान अचानक आलेल्या एका लोंढ्यात तवेरा गाडी नदीत कोसळली. यावेळी गाडीत दोन व्यक्ती होत्या. तेव्हापासून एनडीआरएफ, भारतीय नौदल, अग्निशमन दलाचे जवान आणि लष्कराचे जवान गाडीचा आणि बेपत्ता व्यक्तींचा शोध घेत आहेत. आज नदीच्या पाणी पातळीत घट झाल्याने तवेरा गाडी आढळून आली. क्रेनच्या मदतीने गाडी नदीबाहेर काढण्यात आली. परंतु, बेपत्ता व्यक्तींचा अद्याप शोध लागलेला नाही.

दरम्यान, सचिन संजिव लहाने (वय २२) आणि संदिप जोगदंड (वय २२) अशी बेपत्ता व्यक्तींची नावे असल्याचे समजते. दोघे पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडीचे रहिवासी आहेत. हे दोघे बीड जिल्ह्यातील धानोरे आष्टी येथे प्रवाशांना घ्यायला जात होते. यावेळी ही दुर्घटना घडल्याचे वृत्त आहे.

गाडीची अधिक छायाचित्रे बघा पुढील स्लाईडसमध्ये..