आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेला दरवर्षी बॉलीवूडकडून कोट्यवधींची कमाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुंडे, चेन्नई एक्स्प्रेस, जब वी मेट आणि दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे यासारख्या चित्रपटांमध्ये रेल्वे एका मध्यवर्ती भूमिकेतही होती. दर महिन्यात ती कोणत्या ना कोणत्या चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावते. मुंबईच्या सीएसटी स्थानकावर इंजिन आणि एका डब्यासाठी बिदागी सव्वा लाख रुपये. चार डब्यांच्या रेल्वेला अडीच लाख रुपये रोज. मोठमोठ्या अभिनेत्यांपेक्षाही हा जास्त भाव आहे.

रेल्वेला दरवर्षी मुंबईतून दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई फक्त चित्रीकरणातून होत आहे. यात सर्वात जास्त मागणी छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वेस्थानकाला असते. ऐतिहासिक सीएसटी स्थानकाची नोंद जागतिक वारसा स्थळांमध्ये आहे. मुंबईच्या रेल्वे रुळावर वर्षभर 50 पेक्षा जास्त चित्रपटांचे चित्रिकरण होते. येथे चित्रीकरणासाठी 1.25 लाख आणि चार डब्यांच्या रेल्वेसह चित्रीकरण करावयाचे असेल तर 2.5 लाख भाडे आकारले जाते. लहान स्थानकांसाठीचे शुल्क केवळ 60-30 हजार आहे. याव्यतिरिक्त 5 लाख सुरक्षा ठेव आणि 5 कोटींचा विमाही उतरवावा लागतो.

सुरुवातीस चित्रिकरणासाठी विमा आणि सुरक्षा ठेवेची आवश्यकता भासत नव्हती. मात्र, बर्निंग ट्रेनच्या चित्रिकरणादरम्यान दुर्घटना होऊन नुकसान झाल्यानंतर त्याची आवश्यकता भासू लागली. त्यावेळी चित्रिकरणाचे शुल्क केवळ 100 रुपये रोज होते. बी.आर. चोप्रा यांनी एक महिन्याची परवानगी घेतली होती, म्हणजे त्यांनी 3000 हजार रुपये मोजले होते. दृश्यात जिवंतपणा यावा यासाठी त्यांनी रेल्वेच्या डब््यांना खरोखर आग लावली. एवढेच नव्हे चित्रिकरणानंतर भरपाईही दिली. यानंतर रेल्वेने नव्याने नियम तयार केले. चित्रिकरणाच्या परवानगीसाठी रेल्वेला संहिता द्यावी लागते. रेल्वे संभाव्य धोके, नुकसान , आपल्या वेळा आणि वाहतूकीचा विचार करून परवानगी देते.
चित्रपटांमध्ये रेल्वेचा वापर पहिल्या चित्रपटापासून सुरू होणार होता. लूमियर ब्रदरने 1895 मध्ये जेव्हा जगातील पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली, त्यावेळी त्याच्या दुसर्‍या भागात रेल्वेचे दृश्य होते. आपल्याकडे 1936 मध्ये आलेल्या अछुत कन्या चित्रपटात रेल्वेचा सर्वप्रथम वापर करण्यात आला होता. मात्र, रेल्वेचे सर्वात महागडे दृश्य रुप की रानी चोरों का राजामध्ये होते. यामध्ये अनिल कपूरला हेलिकॉप्टरमधून मालगाडीत उडी टाकून लूटालूट करण्याचे दृश्य होते. शोलेमध्ये रेल्वेवरील दरोडा चित्रित करण्यासाठी हॉलीवूडच्या तज्ज्ञांना बोलावले होते. त्याचे चित्रिकरण सात आठवडे चालले.

रेल्वेवर चित्रिकरण करणे सोपे नव्हते. चित्रपट ‘घर’चे चित्रिकरण बॉम्बे सेंट्रलवर चालू होती. अभिनेत्री रेखाला धावत विनोद मेहराकडे यायचे होते. कधी ती हळू तर कधी वेगात पळत होती. योग्य दृश्य येण्यासाठी रेखाला प्लॅटफॉर्मवर 19 वेळेस धावणे भाग पडले. हे चित्रिपटाच्या शुभारंभाचे दृश्य होते. मात्र, चित्रपटाच्या शेवटी ते दाखवले.