आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातून गांधीवाद संपवण्यासाठी मोदींचे स्वच्छता भारत अभियान - राम पुनियांनी यांचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
-फाळणी केली म्हणून महात्मा गांधींची हत्या केल्याचे सांगितले जाते?
फाळणीला गांधींनी नव्हे, हिंदू-मुस्लिम राष्ट्रवाद्यांनी खतपाणी घातले. स्वातंत्र्य आंदोलनाची प्रेरणा समाजवादी होती. त्यामुळे स्वतंत्र-अखंड भारत देश रशियाधार्जिणा होणे मित्रराष्ट्रांना परवडणारे नव्हते. तेच पाकिस्तानच्या जन्माचे खरे कारण आहे.

-गांधींनी पाकिस्तानला ५५ कोटी रुपये देण्यासाठी आग्रह केला नव्हता काय?
फाळणीच्या वेळी भारत-पाकिस्तानाच्या संपत्तीच्या िवभाजनाचा करार झाला. काश्मीरवर आक्रमण केले असले तरी पाकिस्तानला ५५ कोटी देणे नैतिक कर्तव्य आहे, असे गांधींचे म्हणणे होते. साधनशुचितेनुसार ते योग्यच होते. जगन फडणीस यांचे ‘महात्म्याची अखेर’ नावाचे पुस्तक आहे. त्यात ५५ कोटींच्या प्रकरणापूर्वी गांधींना ठार मारण्याचे हिंदू राष्ट्रवाद्यांनी तीन प्रयत्न केल्याचे लिहिले आहे. त्यामुळे ५५ कोटींचा गांधींच्या हत्येशी संबंध नाही.
-गांधी सनातन हिंदू असताना त्यांना हिंदू राष्ट्रवाद्यांचा इतकाविरोध का?
उच्चवर्णीय हिंदूंचे हितरक्षण करण्यासाठी राजकारण हा पूर्वी हिंदू महासभेचा व आता संघ-भाजपचा छुपा अजेंडा आहे. त्यासाठीच त्यांना हिंदू राष्ट्र स्थापन करायचे आहे. त्यात गांधी अडसर ठरले. गांधींनी राजकारण सामान्यांपर्यंत नेले. राष्ट्रवादाचाविकास केला. त्यामुळे महान हिंदू असलेले गांधी हिंदू महासभा, संघाचे दुश्मन ठरले.

-गांधींनी नेहरूंना झुकते माप देऊन वल्लभभाईंवर अन्याय केला का?
गांधींजवळ जनादेश होता. वल्लभभाई पटेलांपेक्षा नेहरू अधिक प्रागतिक, तरुण व जगाच्या संपर्कात आहेत, असे गांधींना वाटे. त्यामुळे पक्षावर नेहरूंची पटेलांइतकी पकड नव्हती तरी िनधर्मी भारतासाठी नेहरू पंतप्रधान म्हणून योग्य राहतील, असे गांधींना वाटले. तो िनर्णय योग्य ठरल्याचे इतिहास सांगतो.

-जर गांधीवाद इतका आदर्शवादी आहे, मग त्यांच्या गुजरातमध्येच तो का मेला?
मुळात गुजरात महाराष्ट्राइतका प्रागतिक नाही. गुजरातमध्ये स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात दलित, मजूर, शेतकरी चळवळी क्षीण होत्या. गांधी गुजराती होते, तरी त्यांचा आत्मा भारतीय होता. गुजरातमधील अलीकडच्या हिंसाचारास स्थानिक कारणे आहेत. तुम्ही गुजरातकडे बोट दाखवता, मग जगभरातील विद्यापीठांमध्ये ‘गांधीयन थाॅट’ का अभ्यासक्रमात घेतला जातो?