आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादोन दिवसांपूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन आणि त्यांच्या पत्नीने टीव्हीवर घटस्फोटाची घोषणा केली. 30 वर्षांचे वैवाहिक आयुष्य संपुष्टात आले. पुतीन यांची पत्नी ल्युडमिला यांच्या चेहर्यावर ताण नव्हे तर समाधान होते. असे का? लोकांना आश्चर्य वाटले. रशियन माध्यमांनी बातम्या दाबल्या. यामुळे ‘दिव्य मराठी’ने पुतीन दांपत्याच्या नात्यांवर आधारित फस्र्ट पर्सन पुस्तक व रशियन ब्लॉगर्सकडून माहिती मिळवली. या कुटुंबात टोकाचा विरोधाभास आढळला.
ल्युडमिला र्शेबनेवा, जिने पतीसाठी 2002 मध्ये आपले नाव बदलले. र्शेबनेवाची पुतिना झाली. एक स्वतंत्र विचाराची महिला. मात्र, रशियन राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्या व्यक्तिमत्त्वाला एवढी कंटाळली की टीव्हीवर 30 वर्षांचे नातेसंबंध संपुष्टात आणताना का-कू केली नाही. ल्युडमिला यांनी स्पष्टवक्तेपणा दाखवण्यापासून स्वत:ला आवरावे, अशी पुतीन यांची इच्छा होती.
ल्युडमिला यांनी पुतीन यांच्याशी प्रेमविवाह केला होता. त्या वेळी त्या एअरोफ्लो एअरलाइन्समध्ये हवाई सुंदरी होत्या. एका मैत्रिणीमार्फत पुतीन यांची भेट झाली. त्यावेळीपुतीन लेनिनग्राड येथील रशियन कम्युनिस्ट पार्टीच्या मुख्यालयात काम करत होते. दोघांनी तीन दिवस एकत्र घालवले. पुतीन यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे त्या भारावल्या होत्या. तीन वर्षांनंतर पुतीन यांनी ल्युडमिला यांना प्रपोज केले. पुतीन म्हणाले, ल्युडमिला यांनी त्यांच्याशी लग्न केले नाही, तर आयुष्यभर अविवाहित राहू. 28 जुलै 1983 रोजी ल्युडमिला यांनी प्रस्ताव स्वीकारला.
1986 मध्ये ल्युडमिला यांनी लेनिनग्राड स्टेट युनिव्हर्सिटीमधून पदवी प्राप्त केली. येथेच त्यांनी 1990-1994 दरम्यान र्जमन शिकवले. 1999 आधी काही वष्रे त्यांनी जेएससी टेलिकॉमवेस्टमध्ये मॉस्को प्रतिनिधी म्हणून काम केले. नंतरपुतीन यांची प्रतिष्ठा वाढत गेली आणि त्यांच्या नात्यातील अंतरही.
2003 मध्ये एका मुलाखतीत ल्युडमिला म्हणाल्या की, आमच्यात अनेक दिवसांचा अबोला आहे. पुतीन यांना अन्य महिलांचे आकर्षण आहे. आमचे विचार भिन्न आहेत. माझे सडेतोड बोलणे त्यांना आवडत नाही, ते मला रोखतात. राष्ट्राध्यक्षांची पत्नी म्हणून ल्युडमिला लोप्रोफाइलच राहिल्या. प्रकाशझोतापासून दूर. रशियन भाषेसंबंधीच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ल्युडमिला चर्चेत आल्या. त्या रशियन अँकॅडमी ऑफ सायन्सच्या निर्णयाविरोधात होत्या. अँकॅडमी भाषेमध्ये काही बदल करणार होती.
ल्युडमिला यांना ज्योतिषशास्त्राची आवड आहे. मात्र, पुतीन यांना ते खटकत होते. पुतीन यांना त्या रशियाबाबत सांगत त्या वेळी ते तिला गप्प बसण्यास सांगत. ल्युडमिला यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, हवाई सुंदरी असताना सॅँडविच जास्त किमतीने विकत होती. वैमानिकाने आक्षेप घेतल्यानंतर हे काम बंद केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.