आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाहुबली म्हणजे हनिमुन नसलेलं लग्न (दिव्य मराठी ब्लॉग)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्न म्हणजे आयुष्यातला अगदी महत्त्वाचा क्षण. त्याबाबत प्रत्येक तरुणाच्या मनात भावनांची सुरेख जाळी विणलेली असते. असा लग्नाचा क्षण समोर येऊन ठाकतो. सगळं अगदी थाटामाटात पार पडतं. भव्यदिव्य म्हणावं एवढं सगळं शानदार असतं. लग्नात जरा रुसवे-फुगवे येतात. पण त्याने लग्नाचा आनंद मात्र जराही कमी होत नाही. सायंकाळी पाठवणीची वेळ होते. पुन्हा भावना दाटून येतात. पण तेवढ्यात नवरीकडचे म्हणतात, आमच्या अमुक अमुक व्यक्तीने सांगितले आहे, की तुम्हाला नवरीला नेता येणार नाही. नुकतीच वाईट भविष्यवाणी झाली आहे. आता तुम्हाला पुढल्या वर्षापर्यंत वाट बघावी लागेल. पुढल्या वर्षी योग्य मुहूर्त ठरवून आम्ही मुलीला पाठवून देऊ. त्यावेळी नवरदेवाची जी अवस्था होईल तशीच अवस्था बाहुबली चित्रपट बघितल्यावर प्रत्येक प्रेक्षकाची होते.
बाहुबलीचा शेवट चुकला, हे राहुन राहुन प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात येतं. अखेरच्या टप्प्यात चित्रपट अगदी रंगात आलेला असताना थिएटरची दारं उघडली जातात. आपल्याला धक्का बसतो. अरे, चित्रपट तर अजून शिल्लक आहे... मग दारं का उडलीत... पण तो धक्का आपल्याला पडद्यावरही बसतो. चित्रपट संपल्याचं जाहीर केलं जातं. शिवाय याचा पुढील भाग बघण्यासाठी 2016 पर्यंत वाट बघा, असे बिनदिक्कतपणे लिहिलेलं असतं. अवघ्या काही मिनिटांत चित्रपटाची धुंदी ओसरते. त्याची जागा निराशा घेते. आपण उगाच चित्रपट बघितला असं मनात येऊन जातं. मनातील भावना शब्दांचं रुप धारण करतात. इतरांचा फिडबॅक ऐकण्यासाठी कुणाला काही विचारण्याची गरज भासत नाही. प्रेक्षकांचे चेहरेच बोलतात...
इंटरनेट, सोशल मीडिया, स्मार्टफोनच्या जगात एखाद्या थांबायला लावणं म्हणजे वेडेपणाचं लक्षण आहे. या जगात सगळ्यांना सगळं अगदी फास्ट हवं. कारण लोकांची ग्रास्पिंग पॉवरही वाढली आहे. आता या जगाला आपल्याला सवय झाली आहे. सध्या जमाना आय-7 प्रोसेसरचा आहे. तुम्हाला जर अटॉम प्रोसेसरचा कॉम्प्युटर हाताळायला दिला तर चिडचिड होणारच. अशा वेळी तब्बल एक वर्ष थांबणं म्हणजे शुद्ध वेडेपणाच आहे.
पुढील स्लाईडवर बघा, चित्रपट कसा आहे... चित्रपटाची सुरवात आणि कसा होतो शेवट... मध्यंतरी चित्रपट कसा मान टाकतो... इत्यादी इत्यादी....आणि अखेर झालेली घोर निराशा...
बातम्या आणखी आहेत...