आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवे काम सुरू करणार असाल तर हे वाचा...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

365 दिवसांचे एक वर्ष असते. त्यात 56 रविवार आणि 12 सुट्या असतात. तुम्ही कमीत कमी 12 सिक लीव्ह, 12 कॅज्युअल लीव्ह आणि 12 प्रिव्हिलेज लीव्ह घेऊ शकता. 365 दिवसांतून या सुट्या वगळल्या तर 265
दिवस उरतात.


एका दिवसात 24 तास असतात. त्यात 12 तास कामापासून दूर राहावे लागते. या तासांचे 265 दिवसांशी गणित लावले असता (265 ७ 12 % 24) 132 दिवस होतात. हे दिवस 265 दिवसांतून वगळले असता 133 दिवस शिल्लक राहतात. ऑफिसमध्ये कमीत कमी दोन तासांचा वेळ चहा, कॉफी, नाश्ता, जेवण किंवा सहका-यांसोबत चर्चा करणे किंवा सर्फिंगमध्ये जातो. हे सगळे एकत्र केले असता (265७ 2 % 24) 22 दिवस असे उत्तर येते. 133 दिवसांतून हे दिवस वगळले असता 111 दिवस उरतात. म्हणजेच आपण संपूर्ण वर्षभरातील फक्त 30 टक्के वेळच कामासाठी देतो. एक माणूस साधारणत: 70 वर्षे जगतो. आपण ज्या वयात काम सुरू करतो आणि जेव्हा निवृत्त होतो, उदाहरणार्थ जर आपण 35 वर्षे पूर्ण वेळ काम केले असेल तर आपल्या आयुष्यातील 15 टक्के ऑफिसमध्ये देतो.


या सगळ्या हिशेबातून योग्य, चांगले काम करणे किती महत्त्वाचे आहे, ते समजून घ्या. तुमच्या कामामुळे संस्था तसेच इतर लोकांचा फायदा होत असेल, पण काम केल्याने सर्वात जास्त फायदा तुमचा होतो. कामावरूनच तुम्ही स्वत:ला ओळखू शकता. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो.


तुम्ही जे खाता, जसे कपडे घालता, ज्या सुविधांचा लाभ घेता, त्या सर्व तुमच्या कामामुळेच मिळत असतात. त्यामुळे तुम्ही जे काम करत आहात, त्यासाठी हृदयात स्थान निर्माण करा. आपल्याला काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल आभार माना. काम केल्याने फळ मिळते, आयुष्याला एक उद्देश मिळतो. काम उत्साहानेच केले पाहिजे. कामाची पूजा केली पाहिजे. तुम्ही देवाची जशी पूजा करता, त्याच भक्तीने आणि समर्पक भावनेने काम केले पाहिजे.