आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Read Two Marathi King In Maharashtra After Death Of Aurangzeb

मराठेशाहीः जेव्हा छत्रपतींच्या गादीसाठी भोसले कुटुंबात वाहले होते रक्ताचे पाट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगजेबाचा मृत्यू झाल्यानंतर मोगल-मराठे संघर्ष संपुष्टात आला. महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता निर्माण झाली. याचा फायदा मराठे घेतील असा अंदाज औरंगजेबाचा मुलगा आझम याला होता. मोगली मुख्य फौजेचे नेतृत्व करीत तो त्यावेळी दक्षिणेत होता. पण त्याच्या दोन भावांनी त्याच्या सत्तेला आव्हान दिले होते. त्यांचा खातमा केल्याशिवाय मोगली सत्ता हाती येणार नाही, याची पुरेपुर जाणीव त्याला होती. त्यामुळे त्याने उत्तरेकडे कूच केले. यावेळी शाहू महाराज त्याच्यासोबत होते. त्याने मराठ्यांना झुंझवत ठेवण्यासाठी शाहू महाराजांची सुटका केली.
राजाराम यांच्या मृत्यूनंतर ताराबाई यांनी स्वराज्याची सुत्रे स्वतःच्या हाती घेतली होती. शूर सरदारांना नियुक्त करुन मोगलांना झुंझवत ठेवले होते. शाहूंची सुटका झाल्याने आता मराठी सत्तेला दोन राजे लाभले. ताराबाईंनी शाहूंना खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला. पण तो फसला. खेडचे युद्ध झाले. रक्ताचे पाट वाहले. यावेळी वार करणारे आणि अंगावर वार झेलणारे मराठी वीरच होते. त्यांचे राजेही मराठीच होते, आणि ते लढतही मराठी सम्राज्यासाठीच होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्यावर औरंगजेब मुख्य मोगली फौजेसह महाराष्ट्रात दाखल झाला. त्यानंतर त्याने येथेच ठाण मांडले. तब्बल 25 वर्षे त्याने महाराष्ट्रातून देशाचा कारभार बघितला. पण तरीही त्याला मराठी सत्तेला उधळून लावता आले नाही. याचे कारण म्हणजे राजाराम यांच्या मृत्यूनंतर ताराबाईंनी स्वराज्याची सुत्रे हाती घेतली होती. राजगड मोगलांच्या हाती गेल्याने त्यांनी सातारा येथून राज्यकारभार चालवला. त्यांनी परसोजी भोसले, चिमणाजी दामोदर, कदमराव, खंडेराव दाभाडे, कान्होजी आंग्रे, उदाजी चव्हाण, हिंदुराव घोरपडे, धनाजी जाधव, हैबतराव निंबाळकर या शूर सरदारांची वेगवेगळ्या प्रांतांवर नेमणूक करुन मराठीशाहीचे रक्षण केले. दरम्यानच्या काळात धनाजी जाधव ताराबाईंच्या लष्कराचे सेनापती झाले. त्यांनी मोगलांना अगदी सळो की पळो करुन सोडले.
20 फेब्रुवारी 1707 रोजी अहमदनगरला असताना औरंगजेबाचा मृत्यू झाला. गादीसाठी त्याच्या तिनही मुलांमध्ये संघर्ष सुरु झाला. यावेळी मोगलांच्या मुख्य फौजेसह औरंगजेबाचा मुलगा आझम दक्षिणेत होता. इतर दोन भावांचे आव्हान संपुष्टात आणल्याशिवाय सत्ता हाती येणे शक्य नव्हते. त्याने लगेच उत्तरेकडे प्रस्थान केले. भोपाळला आल्यावर झुल्फिकारखान याने त्याला मराठी सत्तेत फुट पाडण्याची गुरुकिल्ली दिली. त्याने तसेच केले. कैदेत असलेल्या शाहु महाराजांना मुक्त केले. आणि महाराष्ट्र दोन सत्ताकेंद्रांमध्ये विभागला गेला. याची परिणती संघर्षात झाली. मराठी सत्तेतच खेडचे युद्ध लढण्यात आले.
पुढील स्लाईडवर वाचा, मोगली सत्तेला घाम फोडणाऱ्या धनाजी जाधवांनी स्वामी बदलला... शाहुंच्या ताटात कोण जेवले... शाहुंचे पारडे कसे जड झाले.... खेडच्या युद्धात कुणाच्या गळ्यात पडली विजयश्री.... शाहू कसे ठरले मोगलांचे मांडलीक... औरंगजेबाने शाहुंना नातवासारखे वाढवले....
(सौजन्य, साभार- मराठ्यांचा इतिहास, लेखक प्रा. मदन मार्डीकर)