आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, घोटाळ्याप्रकरणी चर्चेत असलेल्या पंकजा यांच्याबद्दलच्या 10 गोष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या खात्याने एकाच दिवशी २०६ कोटी रुपयांची चिक्की, डिशेस, चटया आणि वह्या- पुस्तके खरेदी करून मोठा घोटाळा केल्याचा आरोप आहे. त्यासाठी एकाच दिवसात तब्बल २४ अध्यादेश काढल्याचे प्रकरण समोर आल्यामुळे पंकजा वादाच्या भोवर्‍यात सापडल्या आहेत. या बाबात काँग्रेसने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) लेखी तक्रार केली असून या घोटाळ्याची एसीबी किंवा सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.
पंकजा यांनी अत्यंत कमी दिवसांत जी लोकप्रियता मिळवली आहे ती एखाद्या मुरलेल्या कार्यकर्त्यालाही मिळणे अशक्य आहे. लहानपणापासूनच राजकारण घरात पाहात असलेल्या पंकजा यांना गोपीनाथ मुंडे यांनी आपल्यासोबत अनेक राजकीय कामात समाविष्ट करून घेतले आणि आज पंकजा मुंडे - पालवे या महाराष्ट्रातील राजकारणात गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर भाजपाचा नवा चेहरा म्हणून समोर आल्या आहेत.

पुढील स्लाईडवर जाणून घ्या.. पंकजा मुंडे-पालवे यांच्याविषयीच्या 10 गोष्टी....