आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेडीमेडच्या जमान्यात विणकामाला दिली प्रतिष्ठा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरैया हसन, वस्त्रोद्योगतज्ज्ञ
करीमनगरमध्ये स्वातंत्र्य लढ्याच्या काळात वडिलांनी खादीचे पहिले युनिट सुरू केले होते.
सुरैया हसन यांच्याकडे काही महिने आधी ऑर्डर दिल्यानंतर आपल्या वेळेत पोशाख उपलब्ध होतो. २०११ ची गोष्ट आहे. न्यूयॉर्कमधील एका लग्न समारंभासाठी वराने सुरैया यांच्या बॉर्डर अँड फॉल संस्थेकडे शेरवानीसाठी काही महिने आधी ऑर्डर दिली होती. याचे कारण सांगताना त्या म्हणाल्या, माझ्याकडे दोन कारागीर शेरवानीवर काम करतील. सोने आणि चांदीच्या जरीच्या कपड्यांवर एका दिवशी दोन इंचांचे कापड तयार होेते. पूर्णपणे गावात काम करणाऱ्या सुरैया यांनी फॅब इंडिया आणि पियरे कार्डिनसारख्या ब्रँड्ससोबत काम केले आहे. फॅब इंडिया स्थापन झाला तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी अनेकदा स्वत: तयार केलेल्या कपड्यांचा पुरवठा केला आहे.
त्यांचे वडील आणि आजोबा गांधीवादी होते. सरोजिनी नायडू यांच्याशी त्यांची कौटुंबिक मैत्री होती. करीमनगरमध्ये पहिल्या खादी युनिटची स्थापना त्यांनी केली होती. आजही त्यांच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला खादीचे विणकाम येते. असे असले तरी त्यांना वैद्यकीय शिक्षण घेण्याची इच्छा होती. मात्र, कमी गुण पडल्यामुळे त्या कौटुंबिक व्यवसायात उतरल्या. हैदराबादमध्ये त्यांच्या घरासमोर गांधीजींनी स्वदेशी आंदोलन सुरू केले होते. वडिलांच्या काळात हैदराबाद बुक डेपो नावाचे पुस्तकांचे दुकान होते. तिथे अनेक विदेशी प्रकाशकांची पुस्तके मिळत होती. त्या लहान असतानाच पित्याचे छत्र हरवल्याने काकांजवळ राहू लागल्या. दिल्लीत काका आबिद हसन सफरानी विदेश मंत्रालयात काम करत होते. कधी काळी त्यांचे काका सुभाषचंद्र बोस यांचे खासगी सचिव होते. योगायोगाने सुरैया यांचे पती अरविंदो बोस हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पुतणे हाेते. त्या काळात अरविंदो बडे राजकीय नेते होते. त्यांनी अनेक कंपन्यांत कामगार संघटनांचे सचिव म्हणून काम केले होते. दिल्लीत असताना सुरैया यांनी इंदिरा गांधींच्या निकटवर्तीय पुपुल जयकर यांच्यासोबत काम केले आहे. निवृत्तीनंतर सुरैयांचे काका हैदराबादला आले व तिथे हातमाग युनिट सुरू केले. सुरैयांना बोलावल्यानंतर त्याही हैदराबादला गेल्या. तेव्हापासून त्यांचे इथेच वास्तव्य आहे.
ऐंशीच्या दशकातील गोष्ट आहे. मोगलांच्या काळातील हिमरू, पारशी स्टाइल आणि पैठणीचे विणकाम लोप पावत होते. निझाम म्हणजे हैदराबादच्या आसपासच्या भागातील विणकरांची उपजीविका धोक्यात आली होती. तेव्हा सुरैया यांनी विणकरांना धैय आणि बळ दिले. त्यांना सोबत घेऊन सुरैयांची वाटचाल सुरू आहे. सुरैया यांनी विणकरांची उपजीविका सांभाळली असे नव्हे, तर त्यांना सन्मानाने जगण्याच्या मार्गावरही आणले. त्या यासंदर्भात म्हणाल्या, ६०० कुटंुब आमच्या कामात जोडले गेले. त्यांच्या मुलांना सफरानी मेमोरियल स्कूलमध्ये मोफत शिक्षण दिले जाते. आंध्रातील चांगल्या शाळांपैकी ही एक आहे. ८४ व्या वर्षी अनेकदा साखर कमी होते, त्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागते. मात्र, बरे वाटल्यानंतर त्या पुन्हा कामात गुंतवून घेतात.
वय- ८४ वर्षे
शिक्षण-ऑक्सफोर्ड विद्यापीठातून टेक्स्टाइल डिझायनिंगमध्ये डिप्लोमा
कुटुंब- वडील - बदरुल हसन, पती- अरविंदो बोस
चर्चेत- नुकतेच त्यांना देवी पुरस्काराने गौरवण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...