आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त रेबेका ब्रुक्सची रहस्यमय जीवनकथा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेबेका ब्रुक्स : न्यूज ऑफ द वर्ल्डच्या माजी संपादिका
जन्म : 27 मे 1968
कुटुंब : पती चार्ली ब्रुक्स, एक मुलगी.
ब्रिटनच्या फोन हॅकिंगप्रकरणी या माजी संपादिकेचे नाव वादग्रस्त ठरले. न्यायालयातून निर्दोष मुक्तता झाली.

वयाच्या 31 व्या वर्षी न्यूज ऑफ द वर्ल्डचे संपादकपद रेबेकाकडे आले. माध्यमसम्राट रुपर्ट मर्डोक यांची ही दत्तक मुलगी. मर्डोक यांच्या वृत्तपत्र साम्राज्य न्यूज इंटरनॅशनलचे प्रमुखपद 41 व्या वर्षी रेबेकाकडे आले. ब्रिटनच्या राजकीय वर्तुळात त्यांचा प्रचंड प्रभाव होता. त्यांच्या एका शब्दावर बडे नेते त्यांच्या पार्ट्यांना हजेरी लावत होते. वादग्रस्त फोन हॅकिंग प्रकरणात त्यांचे नाव गोवण्यात आल्यावर बर्‍याच रहस्यांचा उलगडा होत गेला.

रेबेका यांचे शालेय जीवनापासूनच पत्रकार होण्याचे स्वप्न होते. 1988 मध्ये ‘द सन’चे फीचर संपादक ग्रॅहम बेल यांच्याशी तिची भेट झाली. पूर्ण आत्मविश्वासाने तिने बेल यांना सांगितले, मला तुमच्यासोबत फीचर सचिवाच्या पदावर काम करायचे आहे. ग्रॅहम बेल यांना आश्चर्याचा धक्काच बसला. हे अशक्य असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय बेल म्हणाले की, पुढच्याच आठवड्यात मी बदली होऊन लंडनला जात आहे. बेल लंडनला पोहोचण्याआधीच रेबेका ब्रुक्स तिथे पोहोचली होती. लंडनमध्ये तिला पाहून ब्रुक्स चकितच झाले.

ब्रुक्सला जलद गतीने प्रगती करायची होती. 1989 मध्ये न्यूज ऑफ द वर्ल्डचे संपादक असलेले पीअर्स मॉर्गन यांनी आपल्या ‘द इनसायडर’या पुस्तकात याचा उल्लेख केला आहे. ते लिहितात, 1994 मध्ये प्रिन्सेस डायनाचा प्रियकर जेम्स हिवेट याची संपादकांसोबत बैठक होणार होती. त्याच्या एक दिवस आधीच ब्रुक्सने त्या कक्षात मायक्रोफ ोन लावला. तेव्हा ती संडे मॅगझीनसाठी काम करत असे. त्यानंतर तिला अनेक बढत्या मिळाल्या.

वडिलांना तिच्या लग्नाची कल्पना नव्हती: ब्रुक्सचे व्यक्तिमत्त्व फार रहस्यमय होते. ‘वेरिंग्टन गार्डियन’च्या रिपोर्टनुसार टीव्हीवर तिच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र ब्रुक्सचे वडील जॉन वेड यांना त्याची कल्पनाच नव्हती. तिचा पहिला पती रॉस कॅम्प कोण आहे, हेदेखील त्यांना माहीत नव्हते. नंतर रेबेकानेच त्यांना सांगितले की, ती अभिनेता रॉस कॅम्पसोबत लग्न करत आहे. मर्डोकच्या चारही मुलींमध्ये रेबेका त्यांच्या जास्त जवळ होती. मर्डोक लंडनमध्ये असताना ते सोबतच पोहण्यास जात असत. ब्रुक्सने मर्डोकना आवडते म्हणून गोल्फ व सर्फिंग शिकले. गर्विष्ठ व बेपर्वा वृत्ती : 2009 मध्ये रॉसशी तिचा घटस्फोट झाला. 2005 पासूनच त्यांच्या संबंधात कटुता आली होती. रॉस कॅम्पला मारहाण केल्याप्रकरणी रेबेकाला पोलिसांनी ताब्यातही घेतले होते. 8 तास जेलमध्ये राहिल्यावर ती तेथून थेट डिझायनर सूटमध्येच कार्यालयात पोहोचली. हा सूट मर्डोक यांनी पोलिस स्टेशनला पाठवला होता. प्रतिस्पर्धी वृत्तपत्रांनी मर्डोकसोबतच्या संबंधांबाबत वादग्रस्त लेखन केले होते. रागाच्या भरात तिने स्वत:च्या न्यूजरूमच्या कर्मचार्‍यावर अ‍ॅश ट्रे फेकून मारला. नशिबाने तो वाचला.

लग्नात पंतप्रधान व भावी पंतप्रधानही: ब्रुक्सची कार्यकक्षा वाढत होती व तिची राजकीय प्रतिष्ठाही वाढू लागली. जून 2009 मध्ये वयाच्या 41 व्या वर्षी तिने चार्ली ब्रुक्सशी लग्न केले. या विवाहाला तत्कालीन पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन व पंतप्रधानपदी आरूढ होणारे डेव्हिड कॅमेरून सहकुटुंब हजर होते. रुपर्ट मर्डोक लग्नासाठी लंडनला आले होते. या विवाह सोहळ्यापासून माध्यमांना दूर ठेवले गेले. ब्रिटनचे माजी उपपंतप्रधान प्रेसकॉट यांच्या मते, ब्रुक्स ब्लेअर व ब्राऊन या दोघांनाही त्यांचीच समर्थक असल्याचे भासवत होती. दोघांसोबतही वेगवेगळे डिनर घेत असे व इकडची खबर तिकडे पोचवत असे. ब्लेअर यांना ब्राऊन यांच्याविषयी काही जाणून घ्यायचे असेल तर ते ब्रुक्सला भोजनासाठी निमंत्रित करत होते. खटल्यादरम्यान ब्रुक्सने न्यायालयात हे मान्य केले होते की, 2010 च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळी डेव्हिड कॅमेरून हे आठवड्यातून दोनदा तिला मेसेज पाठवत . या मेसेजखाली ‘एलओएल’ अशी स्वाक्षरीही ते करत असत. एलओएलचा अर्थ लॉट््स ऑफ लव्ह असा माध्यमांनी काढला होता.

शालेय विद्यार्थिनी मिली डावलरच्या फोन हॅक करण्याचे प्रकरण उघडकीस आले. दुसर्‍या दिवशी ब्रुक्सने तिच्या आईला टीव्ही व वृत्तपत्रांपासून लांब ठेवले. ब्रुक्स वादात अडकली होती. आईला तिने हे सर्व वृत्त खोटे असल्याचे सांगितले होते.

कॉलसनसोबत प्रेमसंबंध होते..
‘तू माझा सगळ्यात चांगला मित्र आहेस, हीच वास्तविकता आहे. मी तुला सगळं सांगते. तुझ्यावर माझा विश्वास आहे. तुझा सल्ला घेते. तुझी मला खूप काळजीही आहे. आपण सुख-दु:खाचे सोबती आहोत. तुझ्याशिवाय मी स्वत:ला सावरू शकत नाही.’

फेब्रुवारी 2004 मध्ये न्यूज ऑफ द वर्ल्डचे माजी संपादक व डेव्हिड कॅमेरून यांचे प्रसिद्धिप्रमुख असलेले अँडी कॉलसनला रेबेकाने असे पत्र लिहिले होते.
(फोटो - रेबेका ब्रुक्स)