आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयुष्‍यातील एक सुंदर क्षण दररोज रेकॉर्ड करून ठेवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


इप्रोफाइल- दिग्दर्शक, निर्माता आणि अ‍ॅनिमेटर. बीएमडब्ल्यू, जिलेटसारख्या कंपन्यांमध्ये काम केले आहे.
TED वर आतापर्यंत 2 लाख 48 हजार 989 लोकांनी हे भाषण ऐकले आहे.


मी न्यूयॉर्कचा रहिवासी आहे. सात-आठ वर्षांपूर्वी शाळा सोडल्यानंतर जाहिरात संस्थेत काम करायला सुरुवात केली होती. रात्री उशिरापर्यंत, साप्ताहिक सुटीतही काम करत असे. माझ्याकडे वेळच नाही असे वाटत होते. एकदा काम करताना मी टेडवरील स्टीफन सॅगमिस्टर यांचे भाषण ऐकले. ‘द पॉवर ऑफ टाइम ऑफ’ म्हणजेच सुटीच्या ताकदीवर ते बोलत होते.दर सात वर्षांनी ते स्वत:चा रचनात्मक प्रकल्प करण्यासाठी एका वर्षाची सुटी घेत असत.
त्या वेळी म्हणालो की, मला एका वर्षाची सुटी घ्यायची आहे. फिरण्यासाठी, कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी आणि स्वत:च्या रचनात्मक कल्पना सत्यात उतरवण्यासाठी या वेळेची खूप गरज आहे.


या प्रोजेक्ट्सपैकी मी सर्वात पहिल्या प्रोजेक्टला नाव दिले- ‘वन सेकंड एव्हरी डे’.तेव्हापासून आजपर्यंत मी माझ्या आयुष्यातील एका सुंदर क्षणाची दररोज नोंद ठेवत आहे. आयुष्यातील एका छोट्या भागाची नोंद घेत मी सतत चालणारा एक चित्रपट बनवणार आहे. भूतकाळातील क्षणांची आठवण न राहणे, या गोष्टीविषयी मला खूप चीड आहे. एखादी व्यक्ती जोपर्यंत मागे घडलेल्या क्षणांविषयी बोलत नाही, तोपर्यंत आपल्याला त्या चांगल्या घटनांची आठवणच होत नाही. त्यामुळे मी माझ्या आयुष्यातील एका छान सेकंदाची दररोज नोंद ठेवत आहे. मी 80 वर्षांचा होईन तेव्हा हा चित्रपट पाच तासांचा होईल. म्हणजेच नोंद केलेला प्रत्येक क्षण मला गेलेल्या दिवसांची आठवण करून देण्यासाठी एखाद्या सेतूप्रमाणे काम करीन. चांगल्या दिवसात तर मी अनेकदा दोन-चीन सेकंदांची फिल्म तयार करतो. ब-याचदा लोक एखाद्या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग करण्यात खूप वेळ घालवताना मी पाहतो. फोनच्या नजरेतून ते कार्यक्रम पाहत असतात. याउलट या कार्यक्रमातील एका सेकंदाची नोंद ठेवल्यास त्यांना संपूर्ण कार्यक्रम आठवण्यात खूप मदत होऊ शकते. एक सेकंद असा होता की माझ्या पत्नीच्या बहिणीला आतड्यात दुखू लागल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अशा वेळी रेकॉर्डिंग करणे कठीण असते. पण चांगली वेळ असो किंवा वाईट, रेकॉर्ड करणे महत्त्वाचे आहे, असे माझे मत आहे. काळ नेहमीच चांगला नसतो. वाईट प्रसंगांची रेकॉर्डिंग तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देते.


रेकॉर्डिंग करताना कुणीही फिल्टर वापरत नसतात. म्हणजेच मी रेकॉर्ड करताना एवढ्या नैसर्गिक पद्धतीने रेकॉर्ड करतो की जणू तो क्षण मी माझ्या डोळ्यांनी पाहत आहे. हा नियम मी नंतर बनवला. यापूर्वी रेकॉर्डिंगमध्ये ब-याचदा मी दिसलो आहे. पण नंतर मला जाणवले की आयुष्यातील क्षण साठवून ठेवण्यासाठी ही पद्धत चूक आहे.या प्रोजेक्टविषयी माझ्या मनात एक विचार आला. माझ्यासारखीच हजारो लोकांनी आपल्या आयुष्यातील छोट्या छोट्या क्षणांची रेकॉर्डिंग केली तर? प्रत्येक जण याकडे वेगळ्या दृष्टीने बघेल आणि त्याची वेगळी व्याख्या करेल, असे मला वाटते. अशा पद्धतीने प्रत्येकाला वेगवेगळा फायदा होईल.


खासगी आयुष्यात मी माझ्या विसरण्याच्या सवयीमुळे हैराण झालो होतो. त्यामुळे भूतकाळातील क्षण आठवणीत ठेवण्याची ही चांगली पद्धत आहे. आज प्रत्येकाकडे रेकॉर्डिंग करण्यासाठी काही ना काही उपकरण नक्कीच असेल,याची मला खात्री आहे. त्यामुळे मी आवाहन करतो की, तुम्हीही आयुष्यातील दररोजचा एक सेकंद रेकॉर्ड करा, जेणेकरून तो क्षण तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील.