आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंदिरा गांधींच्या हत्येनंतर सर्वाधिक मतदान, 2004 मध्ये सर्वात कमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत विक्रमी मतदान होण्याची अपेक्षा आहे. निवडणूक आयुक्त एचएस ब्रह्मा यांनी 70 टक्क्यांचा अंदाज वर्तविला आहे. कारण आहे, तरुणांचे स्वारस्य. ही पिढी सोशल मीडियाच्या माध्यमातून नेते आणि मुद्यांवर सर्वाधिक चर्चा करत आहे. गेल्या निवडणुकीत मतदान 58.70 टक्के होते. आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक मतदान 1984 साली झाले. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर नागरिकांनी कॉँग्रेसला भरभरून मते दिली. सर्वात कमी मतदान 2004 च्या निवडणुकीत झाले. रालोआची (एनडीए) ‘इंडिया शायनिंग’ घोषणा लोकांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्यात अपयशी ठरली. जाणून घ्या, केव्हा, कोणत्या मुद्यांवर लोकांनी किती मतदान केले.

1952: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबईत पराभूत
489 जागांवर निवडणुका. 398 कॉँग्रेसने जिंकल्या. 17 जागांसह कम्युनिस्ट पक्ष दुसर्‍या स्थानी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मुंबईत झालेला पराभव हा तेव्हा सर्वात मोठा निकाल ठरला होता.
मतदान - 61.20%

1957 कॉँग्रेसची वाढ
494 जागांवर निवडणुका. कॉँग्रेसच्या जागा वाढून 402 झाल्या. कम्युनिस्ट पक्षाच्या जागाही 29 पर्यंत वाढल्या.
मतदान- 62.20%

1962 नेहरु, शास्त्रींचे निधन
494 पैकी कॉँग्रेसने 394 जागा जिंकल्या. 1964 मध्ये पंडित नेहरु, 66 मध्ये लालबहादूर शास्त्रींचे निधन.
मतदान- 55.42%