आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उंदरांमुळे त्रस्त ब्रिटिश पीएम हाऊसमध्ये आणखी दोन मांजरांची भरती; पण त्यांच्यावर करातून मिळणारा पैसा खर्च होणार नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - उंदरांमुळे त्रस्त १०, डाउनिंग स्ट्रीट या ब्रिटिश पंतप्रधान निवासासाठी आणखी दोन मांजरांची भरती करण्यात आली आहे. उंदरांच्या शिकारीसाठी तेथे आधीपासूनच तीन बोके तैनात आहेत, पण हे तिघेही आळशी झाले आहेत. शिकारीएेवजी जास्त काळ ते उन्हातच बसतात. त्यांच्या ‘अपयशा’मुळेच मंत्रिमंडळाला मांजरांची पलटण वाढवणे भाग पडले.

व्हाइट हॉलच्या प्रमुखाने ट्विट करून म्हटले की, डाउनिंग स्ट्रीटमध्ये आमच्या दोन नव्या पाहुण्यांचे (मांजरी) स्वागत करा. सिलिया हॅमंड अॅनिमल ट्रस्टकडून ही दोन मांजरे घेतली आहेत. त्यांची नावे इव्हलिन शार्प (इव्ही) आणि ओस्मोथर्ली (ओजी) अशी आहे. इव्ही ही ओजीची आई. इव्हीचे नाव ब्रिटनच्या पहिल्या सिव्हिल सर्व्हिस सेक्रेटरीच्या नावावर ठेवले आहे. ओजीचे नाव संसदीय समितीचे तज्ज्ञ ईसीबी ओस्मोथर्ली यांच्या नावावर ठेवले आहे. माध्यमांच्या वृत्तात म्हटले आहे की, या दोघांच्या खर्चासाठी लोकांच्या कराचा पैसा वापरला जाणार नाही.

मात्र, त्यांचा खर्च कोण करणार हे वृत्तात नमूद नाही. १० डाउनिंग स्ट्रीटमध्ये सध्या लॅरी, पामर्स्टन आणि ग्लॅडस्टोन हे तीन बोके आहेत. सातवर्षीय लॅरी या मांजरांच्या पलटणीचा बॉस आहे. तो नेहमीच परराष्ट्र मंत्रालय कार्यालयात तैनात पामर्स्टनशी भांडत असतो. जुलैमध्ये पामर्स्टनशी झालेल्या भांडणात तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर तो थोडा सुस्त झाला आहे. एकटाच फिरतो. ग्लॅडस्टोनला उन्हात बसणे खूप आवडते.
पीएम हाऊसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, लॅरी आता खूप सुस्त असतो. त्याचे कारण म्हणजे तो जखमी असावा किंवा त्याचे वाढते वय. तो असाच राहिला तर त्याला येथून हटवलेही जाऊ शकते. लॅरीचे छायाचित्र तत्कालीन पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्यासोबत आले होते. त्यात मांडीवर बसलेल्या लॅरी ला कॅमेरून कुरवाळताना दिसतात.
आगमन होताच इव्ही आणि ओजीने केली ६ उंदरांची शिकार
इव्ही (डावीकडील) आणि ओजी खूप चपळ आहेत. शिकार दिसताच ते तुटून पडतात. भरतीनंतर काही दिवसांतच या दोघांनी ६ उंदरे मारली आहेत. याउलट लॅरीने या काळात फक्त एका उंदराची शिकार केली आहे. तो शिकारीएेवजी नुसता फिरतो किंवा उन्हात बसतो.
बातम्या आणखी आहेत...