आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकर्षक छबीसाठी ओठांवर वापरा लाल रंगाच्या छटा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाल रंगाची लिपस्टिक लावताच कूल लूक येतो, असे डिझायनर रिना ढाका यांचे मत आहे. याच कारणामुळे लाल रंग प्रत्येक प्रकारच्या स्कीन टोनवर खुलून दिसतो. सावळ्या तरुणींना लाल रंग शोभून दिसत नाही, असे अनेकांना वाटते; पण लाल रंगामध्ये चेरी रेड ते रुबी रेड अशा विविध छटा आहेत.


जो रंग तुमच्या त्वचेच्या रंगाला साजेसा आहे, तोच रंग वापरा. डान्सर डिता वोन टेसी हिला लाल रंग खूप आवडतो. हा रंग लावताच चेहरा खुलून उठतो, असे ती म्हणते. नेहमीपेक्षा वेगळे दिसण्याची इच्छा असेल तर आयर्न मॅन - 3 चित्रपटातील अभिनेत्री ग्विनिथ पॅलथ्रोसारखी लिपस्टिक लावून पाहा.


करिना कपूरच्या त्वचेचा रंग मिल्की व्हाइट आहे. त्वचेचा पोत चांगला आहे. म्हणूनच तिच्यावर लाल रंगाची सर्वात उजळ छटा ‘ब्लड शेड’ खूपच उठून दिसते. बिपाशा बसूप्रमाणे सावळी किंवा ऑलिव्ह त्वचा असेल तर रोझी रेडसारखा उजळ किंवा मरूनसारख्या गडद रंगाची लिपस्टिक वापरू नये. यामुळे ओठ रसरशीत न दिसता, बारीक दिसतात. ओठांवर शिमरी इफेक्ट देण्यासाठी ग्लॉसचा वापर करता येईल, असे डिझायनर राणा गिल यांचे मत आहे. आकर्षक दिसण्यासाठी गालांवर तीच लाल छटा वापरा, जी ओेठांवर लावलेली असेल. हे अधिक प्रोफेशनल व ट्यून दिसते. लिपस्टिक बाहेर पडू नये, यासाठी ओठांच्या कोप-यावर फाउंडेशन लावा. ड्रामॅटिक इफेक्टसाठी लिपस्टिक लावण्यापूर्वी लिपलायनरने आउटलाइन आखून घ्या. लिपस्टिक लावल्यावर टिश्यू पेपर ओठांमध्ये घट्ट दाबून धरा. असे केल्याने जास्तीची लिपस्टिक निघून जाईल. दातांना लिपस्टिक लागण्याची शंकाही राहणार नाही.


डोळ्यांच्या मेकअपसाठी साध्या रंगांचा वापर करा. असे केल्यामुळे ओठांकडे लक्ष केंद्रित होईल. लाल लिपस्टिक ही नियॉनपासून पेस्टल शेडपर्यंत सर्वांवर उठून दिसते. रेड लिपस्टिक तुमच्या व्यक्तिमत्त्वाला उठाव देते. लिप प्लंपरचा वापरही करू शकता. हे भारतात सहज उपलब्ध होते. ऑनलाइन ऑर्डरही नोंदवता येते.