आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवणीतले डॉ. कलाम: विनयशील साधेपणातून सामान्यांना दिली प्रेरणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आदर्श व्यक्तिमत्त्व
चार-पाच वर्षांपूर्वी होलीक्रॉस शाळेत डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम आले होते. त्या वेळी काही विद्यार्थी आणि शिक्षकांना त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. तेव्हा त्यांच्याशी बोलण्याची, त्यांना पाहण्याची संधी मिळाली. प्रत्येक विद्यार्थ्याशी बोलताना ते वैयक्तिक चौकशी करत होते. मुलांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देताना त्यांच्यातील साधेपणा, विनय हे सर्वांनाच आश्चर्य वाटणारे होते. साधी राहणीमान, एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ, राष्ट्रपती असतानाही विद्यार्थ्यांबद्दल, देशाच्या युवा पिढीबद्दल असलेला विश्वास आणि त्यांच्याशी संवाद साधताना असलेली आपुलकी ही प्रत्येक शिक्षकाने आत्मसात करायला हवी. असे आदर्श व्यक्तिमत्त्व डॉ. कलाम. त्यांच्याशी थोडा वेळ का होईना पण संवाद साधता आला, हे भाग्यच मानते. प्रतिभा काकडे, माजी मुख्याध्यापिका, शारदा मंदिर
शब्दांकन : विद्या गावंडे

नावीन्याचा शोध घ्या
औरंगाबादेतील एमजीएममध्ये झालेल्या एका कार्यक्रमानिमित्त डॉ. कलाम यांना भेटण्याची संधी मिळाली. सुरक्षा रक्षकांचे कडे तोडत मी त्यांच्यापर्यंत पोहोचले होते. माझी धडपड पाहून डॉ. कलाम यांनीच मला जवळ बोलावले. माझ्याविषयी विचारपूस केली. मी एकच प्रश्न विचारला होता, आयुष्यात अपयश आले तर काय करावे ? त्यांनी खूप छान उत्तर दिले होते. अपयशाने खचून जाणे हा त्यावरील उपाय नाही, तर अपयश का आले त्याचा शोध घेऊन यशाच्या दिशेने वाटचाल करणे हेच खरे यश आहे. स्वत:वर विश्वास ठेवा. सतत नावीन्याचा शोध घ्या. अपयश आव्हान म्हणून स्वीकारण्याची तयारीदेखील ठेवा. त्यांच्यासोबतचा तो क्षण मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. ही भेट मला खूप प्रेरणा देणारी ठरली आहे. रुखसार जमादार, औरंगाबाद

बेस्ट लक, गो अहेड
१० मार्च २०१३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये आयोजित पदवी प्रदान सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून डॉ. कलाम आले होते. मी एमए एमसीजे अभ्यासक्रमात विद्यापीठातून पहिला आलो असल्याने त्यांच्या हस्ते मला पुरस्कार मिळावा अशी माझी अपेक्षा होती. पदवी प्रदान सोहळ्यासाठीचे पास जवळ असूनही आम्ही काही जण मुद्दाम विद्यापीठ परिसरात थांबलो. सुरक्षा यंत्रणेतून वाट काढत त्यांच्याजवळ जाऊन मी रोटरॅक्ट क्लबच्या सामाजिक कामाविषयीची त्यांना माहिती दिली होती. तेव्हा त्यांनी उच्चारलेले एक वाक्य माझ्या आयुष्यभर स्मरणात राहील. ‘बेस्ट लक, गो अहेड’ त्यांच्या या एका वाक्याने मला माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी प्रेरणा मिळाली.
विवेक एम. राठोड, औरंगाबाद

पुढे वाचा.. कार्य सार्थकी लागले...