लोकनेते आणि माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे तळागाळातील कार्यकर्त्यांचे नेते होते. सर्वांना सामावून घेण्याची, त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी झटण्याची, गोरगरीबांच्या न्याय हक्कांसाठी लढण्याची त्यांची वृत्ती होती. यामुळेच त्यांना लोकनेते असे म्हटले जाते.
भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनी त्यांना राजकारणात आणले. राजकीय डावपेच शिकवले. त्यानंतर गोपीनाथ यांनी अगदी मुरब्बी राजकारण्याप्रमाणे धुवांधार खेळी केली. भल्या भल्या राजकारण्यांना आव्हान देऊन मैदान दणाणून सोडले. या क्षमतेमुळे केंद्रीय मंत्रिपदाची माळ त्यांचा गळ्यात पडली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना बघितले जाऊ लागले. यासाठी त्यांच्या पक्षातील नेत्यांप्रमाणेच घटकपक्षांचीही अनुकूलता होती. पण मधेच अघटीत घडले. त्यांना काळाने हिरावून नेले. महाराष्ट्र एका लोकनेत्याला मुकला. तो कायमचाच...
लोकनेता गोपीनाथ मुंडे यांचे हे फोटो बघितल्यावर डोळ्यांत अश्रू तराळून येतील...पुढील स्लाईडवर क्लिक करा...