आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Report About What People Think About Tourism Spot

निसर्गाच्या सहवासात आनंद लुटण्याची इच्छा, पण दारूने बिघडली पर्यटनस्थळे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोवा - चोरी आणि छेडछाडीचा पर्यटकांना होतो त्रास
पणजी - बीच कॅपिटल संबोधला जाणारा हाच तो गाेवा आहे. जगभरात गोव्याची हीच ओळख आहे. बीच कॅपिटल असल्यामुळे गोव्यात आल्यानंतर हॉटेलमध्ये चेक-इन केले अाणि सर्वात पहिल्यांदा कोलवा बीचवर पोहोचले. गोव्यातील ५० समुद्रकिनाऱ्यांमध्ये दक्षिण गोव्यातील कोलवा सर्वात प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे. एका मोडक्या खुर्चीवर बसले होते. जवळ बसलेल्या परेरा अांटीची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडे पोर्तुगालचा पासपोर्ट आहे. त्या गोव्यात लहानपणापासून राहतात. त्या म्हणाल्या, मी जरा फेरफटका मारून येते तोपर्यंत माझ्या सामानाकडे लक्ष असू द्या. त्यावर माझ्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे पाहून त्यांनी इथे खूप चोर असल्याचे सांगितले. ही जुनी स्लीपर चोरायलाही कमी करणार नाहीत. एकट्याने प्रवास करणे अाणि साहसपूर्ण पर्यटनावर निघण्याची सध्या फॅशन आहे. मात्र, गोव्याला जायचे असेल तर चार वेळा विचार करायलाच हवा. निदान दोनदा तरी विचार अवश्य करा.

बीचवर पोहोचलेली बंगळुरूच्या आयटी कंपनीची प्रोफेशनल माझ्यासारखीच सोलाे ट्रॅव्हलर आहे. ती म्हणाली, किनाऱ्यावर चालताना थोडे लांबवर गेले तेव्हा काही मुले पिच्छा करू लागली. भीती वाटल्याने या वृद्ध अांटीच्या घोळक्यात येऊन बसले. आपल्या लांब कुर्ता आणि जीन्सकडे पाहत ती म्हणाली, पाहा, मी तर बीच कॉश्च्युमही घातले नाही. तरीही छेडछाड होते. बीचवर आल्यापासून ते माझ्या मागावर होते. त्यांनी येथून बिअर खरेदी केली होती. बिनधास्तपणे पीत होते. विश्वास ठेवा, गोव्याच्या बीचवर खारे पाणीच नव्हे तर दारूही वाहते. हवे तर गोव्याला बूज कॅपिटल संबोधा. लोक इथे स्वस्तात दारू पिण्यासाठी येत असतात. कोणाचीही आडकाठी नाही. कर कमी असल्यामुळे देशात सर्वात स्वस्त दारू इथेच मिळते. बूज कॅपिटलचा लोकांना त्रास होतो, मात्र दारूविरुद्ध काेणी उघडपणे बोलू शकत नाही. एक वरिष्ठ महिला पोलिस अधिकारी म्हणाल्या, पर्यटकांचे आव्हान असते. ते एक दिवस येतात आणि दुसऱ्या दिवशी निघून जातात. त्यंाना ट्रॅक करणे आव्हान ठरते. मद्य ही येथील समस्या आहे काय, या प्रश्नावर त्या म्हणाल्या, यातून गोव्याला महसूल मिळतो. नाइलाज आहे. मात्र, दारूची बाटली केवळ पर्यटकाकडे दिसेल असे त्यांचे म्हणणे होते. अबकारी विभागाच्या एका अधिकाऱ्याचे उत्तर चमत्कारिक होते. त्याने विचारले, महसूल मिळतो, पण वातावरण बिघडत नाही काय? यावर त्यांनी गोव्यातील म्हण एेकवली. गोयंकार सुशेगाद, म्हणजे गाेव्यातील लोक निवांतपणे जगणारे आहेत. त्यांना कोणाला त्रास द्यावयास आवडत नाही. अतिथी देवो भव ते मानतात. त्यामुळे पर्यटकाला अडवत नाहीत. प्रशांत शेटेही गाेव्यातील आहेत. त्यांना विचारले, गोवा खरेच देशातील सर्वात सुरक्षित पर्यटन स्थळ आहे काय, त्यावर त्यांनी सुरक्षित होते, असे उत्तर दिले. गोव्यातील लोक सधन आहेत. त्यांना पैशाची कमतरता नाही. विद्यार्थी-शिक्षक, डॉक्टर-लोकसंख्या दर चांगला आहे. येथील साक्षरता ९२ टक्के आहे. मात्र, गोव्यात व्यवसाय करणाऱ्या विदेशींची मोठी चिंता आहे. गोव्याचे पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनीही याची कबुली दिली. त्यांनी गोव्याला ड्रग डेन म्हटले होते. पुरावे नसले तरी गोव्यात अमली पदार्थ व्यवहाराची उलाढाल ५००० कोटींची आहे. शहरातील ५००० टू व्हीलर्स भाड्याने दिल्या जातात. येथील मंदिर, चर्चची स्वत:ची ओळख आहे. येथील हेरिटेज होमवर पोर्तुगालची छाप आहे. गाेव्याच्या पर्यटनाचा सुखद अनुभव येतो. मात्र, दारूच्या अतिरेकी प्रभावामुळे गोव्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
पुढे वाचा, केरळच्या पर्यटनाबाबत..