आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिझर्व्ह बँक चालवणा-या दोन व्यक्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक व्यावसायिक नोकरशहा, तर दुसरे बुद्धिवादी नोकरशहा. दोन्ही भिन्न व्यक्तिमत्त्वे. एक रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदावरून निवृत्त झाले आहेत, तर दुस-यांनी नुकतीच ही जबाबदारी पेलली आहे. दोघेही आयआयटी पासआउट, दोघांनीही अमेरिकेत पदवी घेतली असून पीएचडीसुद्धा केली आहे. दोघांनीही एक शास्त्र म्हणून अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला आहे. आता ज्यांच्यावर जबाबदारी आहे, ते कशा प्रकारे ती पार पाडणार हे पाहायचे आहे.


०रघुराम गोविंद राजन : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर
एक रूपया वेतन घेत केले कामण्‍ आता नोटांवर असेल सही
> जन्म : 3 फेब्रुवारी 1963, भोपाळ, मध्य प्रदेश.
> शिक्षण : वडील भारतीय परराष्ट्र सेवेत अधिकारी होते. त्यामुळे प्राथमिक शिक्षण श्रीलंका, इंडोनेशिया आणि बेल्जियममध्ये झाले. त्यानंतर दिल्लीत शिकले. आयआयटी दिल्लीतून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केले. आयआयएम अहमदाबादमधून पीजीडीबीए आणि एमआयटीतून डॉक्टरेट घेतली.
> यश : आयएमएफमध्ये सर्वात लहान वयाचे आर्थिक सल्लागार आणि मुख्य अर्थतज्ज्ञ.
> कुटुंब : पत्नी- राधिका राजन व एक मुलगा.


‘रिझव्हॅ बँकेचे गव्हर्नर होणे म्हणजे मत गोळा करण्यासारखे नव्हे. येथे योग्य तेच करावे लागते.’
- रघुराम राजन


ते सुब्बाराव यांच्यासारखे अधिकारी नाहीत. गव्हर्नर पद स्वीकारल्यानंतर पहिल्या 13 दिवसांतच त्यांना पतधोरण जाहीर करायचे आहे. ही देशाचे कर्जविषयक धोरण आहे. सरकार आणि बँकर्सना याकडून खूप आशा असतात. सुब्बाराव असताना त्या कधीही पूर्ण होऊ शकल्या नाहीत. ‘सेव्ह कॅपिटॅलिझम फ्रॉम कॅपिटॅलिझम’सारखे पुस्तक लिहिणारे राजन नेहमीच संपत्ती जमा करण्याचा सल्ला देत असतात; पण देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार असताना त्यांनी दर महिन्याला केवळ 1 रुपया पगार घेतला आहे, हे विशेष. सकल वार्षिक उत्पन्नाचे आकडे फुगवण्याऐवजी सरकारने अर्थव्यवस्थेतील उणिवा दूर कराव्यात, अशी त्यांची धारणा आहे. 2005 मध्ये अमेरिकेने फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष अ‍ॅलन ग्रीनस्पेन यांच्या निवृत्तीच्या कार्यक्रमात राजन यांनी त्यांचा प्रबंध वाचला होता. त्याचा सार असा होता की, आर्थिक विकासामुळे जोखमी वाढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्यावर टीका झाली होती. मात्र, 2008 मध्ये आर्थिक संकटात सापडल्यानंतर सगळ्यांना त्यांचे म्हणणे पटले. नोव्हेंबर 2008 मध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांना मुख्य आर्थिक सल्लागारपदी नियुक्त केले. कठीण उपायांमुळे काही काळ अर्थव्यवस्था संथ होईल, मात्र त्यानंतर चांगले परिणाम दिसतील.


गव्हर्नरपद स्वीकारल्यानंतर त्यांच्यावर विदेशी नागरिक असल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रत्युत्तरादाखल त्यांनी पासपोर्ट सादर केला. हिंदी भाषेविषयी बोलताना ते सांगतात की, ‘मी दहावीपर्यंत हिंदीत शिक्षण घेतले. 7 वी ते 12 वीपर्यंत दिल्लीत राहिल्याने निम्मा उत्तर भारतीय आहे.’ ते सांगतात, ‘पदवी प्राप्त केल्यानंतर कॉर्पोरेट क्षेत्रात काम करत दहा वर्षांत मला सीईओ व्हायचे होते; पण त्यानंतर मला वाटले की, या कामात मला फार समाधान मिळणार नाही.

०दुव्वुरी सुब्बाराव : रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर
> जन्म : 11 ऑगस्ट 1949, अ‍ॅलुरू, आंध्र प्रदेश.
> शिक्षण : सैनिकी शाळा कोरुकोंडा, आयआयटी खडगपूरमधून भौतिकशास्त्रात बीएस्सी ऑनर्स, आयआयटी कानपूरमध्ये भौतिकशास्त्रात एमएस्सी, अमेरिकेतील ओहियो विद्यापीठात अर्थशास्त्रात पदव्युत्तर, आंध्र विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट.
> यश : 1972 मध्ये नागरी सेवा परीक्षेत अव्वल. या सेवेतील पहिले आयआयटीचे विद्यार्थी.
> कुटुंब : पत्नी ऊर्मिला (अधिकारी), दोन मुले मलिक आणि राघव.


‘दोन वर्षांपूर्वी वित्तीय तूट भरून काढण्यासाठी सरकारने योग्य पावले उचलली असती तर आज अर्थव्यवस्थेची अशी दशा झाली नसती.’- डी. सुब्बाराव


मित्र परिवार आणि नातेवाइकांमध्ये ‘सुब्बा’ या नावाने ओळखले जाणारे सुब्बाराव अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे खास असल्याने गव्हर्नरपदी रुजू झाले. सरकारी धोरणानुसार ते पतधोरणात बदल करतील, अशी सरकारची अपेक्षा होती; पण त्यांनी ऐकले नाही. अखेरपर्यंत ते सरकारला दोष देत राहिले. त्यानंतर त्यांना सहका-यांचे न ऐकणारा नकाराधिकार वापरणारा अधिकारी म्हटले जाऊ लागले.


त्यांच्या वर्तणुकीचा अंदाज लावणे कठीण आहे. 2012 ची गोष्ट आहे. एक घोटाळा उघड करणारी व्यक्ती (व्हीसलब्लोअर) एका बँकेतील फसवणुकीची माहिती देण्यासाठी आली होती; परंतु सुब्बाराव यांनी त्या व्यक्तीविषयीच उलट माहिती बँकेला दिली. त्यामुळे ती संकटात आली.
यापूर्वी त्यांच्याविषयी असे मत नव्हते. ते पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेत होते. सरळ जीवन जगणारे सुब्बाराव खूप साधे आहेत. त्यांना फोनही उचलायला आवडत नाही. त्यांची पत्नीच फोनला उत्तर देते; पण नॉर्थ ब्लॉकमधील लोकांच्या मते ते कधीही सुब्बाराव यांना भेटू शकतात.


त्यांना आर्थिक सुधारणा घडवण्याची तळमळ असल्याचे त्यांचे सहकारी सांगतात. त्यामुळेच त्यांचा पीएचडीचा प्रबंधसुद्धा ‘फिस्कल रिफॉर्म्स अ‍ॅट द सब नॅशनल लेव्हल’ या विषयावर आहे. ते नेहमी शांत असतात. याच व्यक्तीचे हस्ताक्षर असलेल्या नोटा सध्या मिळत आहेत. त्यांनी रिझर्व्ह बँकेला कधीही एक रहस्य असल्यासारखे भासवले नाही. त्यांच्या प्रयत्नांमुळेच या केंद्रीय बँकेची दारे सर्वसामान्यांसाठी उघडली. रिझर्व्ह
बँकेतील लोक काय काम करतात, ही सर्वसामान्य नागरिकांची जिज्ञासा डी. सुब्बाराव यांनीच शमवली.