आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिंगण : मानाचा गोंधळ अन् विश्वासू मुजरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अखेर वैरी न चिंती ते मन चिंती हेच खरे. काल डायरीत लिहिल्याप्रमाणे फोटोग्राफरभूषण व शिवबंधनकार धाकल्या महाराजांनी सत्तेच्या सोपानावर न चढता मानाचा गोंधळ घालायचे ठरवले. आमचाबी हिरमोड झाला. मोदींच्या लाटेत कमळाबाईची सरशी झाली. कशीबशी घासून शीट काढली होती, पर सारा िवस्कोट झाला. आवाजी मतदानात आवाज कुणाचा... म्हटल्यावर कमळाचाच आवाज घुमला, भाजपने चांगला गेम केला. त्या गोंधळात आम्ही आजवर पक्षासाठी घातलेले विश्वासू मुजरे कोणालाच आठवले नाहीत. कसलं मंत्रिपद अन् कसलं अध्यक्षपद .. आता िनक्का गोंधळ घालायचं काम येणार वाट्याला. चांगला सत्तेचा घास आला होता तोंडाजवळ, पर धाकल्या महाराजांच्या राजकारणानं सारं गणितच बिघडलं. आता गल्लोगल्लीत आवाज कुणाचा.. असं म्हणायची बी चोरी. पर देसाईंनी न थकता मुंबई-दिल्ली अशा मारलेल्या चकरा आणि कोकणभूषण रामदासभाईंच्या उत्साहावरून थोडा िदलासा मिळाला म्हणा. भाईंनी अस्पष्ट बाेलत पुढची नीती स्पष्ट शब्दांत, अशुद्ध मराठीत एकदा आणि शुद्ध हिंदीत एकदा समद्या चॅनेलांसमोर सांगितली. त्यांचा जोश पाहून पुन्हा जुने दिवस आठवले. आता पाच वर्षे मानाचा गोंधळ घालायला मोकळे झालो. पर कायबी म्हणा, अपक्षांची मात्र चांदी झाली राव, आपणबी उगाच धनुष्य गळ्यात अडकवून घेतलं. ह.प.ब. (हरवक्त पक्ष बदल) पाचपुते महाराज चांगलं म्हणत होते, अरे, चल माझ्यामागे, पर त्यांचं ऐकलं नाही याची खंत आता पाच वर्षं बाणासारखी टाेचत राहणार. धाकल्या महाराजांच्या डोक्यात हे १८० चं खूळ कुणी घातलं याचं अपटेड घ्यायला पाहिजेल. त्या एकवीरा आईनंबी कशी अशी बुद्धी दिली कोणास ठाऊक. आता निवडणुकीच्या काळात घेतलेल्या पैशाचं देणेकरीबी तगादा लावणार. त्यांना कुण्या तोंडानं उत्तर देणार? मंत्रिपद तर सोडाच, साधी सत्ताबी आपल्यामागं नाही, लय जोशानं विरोधी बाकांवर बसायचा घाट घातला. आता गल्लीतलं झिपरं काळं कुत्रंसुद्धा विचारणार नाही आपल्याला. सत्तेचा बाज काही वेगळाच असतो, त्याची शान मानाच्या गोंधळाला आणि घात झालेल्या विश्वासू मुज-यांना थोडीच येणार