आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संस्कृती नव्हे, ओळखीचा संघर्ष दर्शवते आहे अॅथलिट्सचे हे छायाचित्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑलिम्पिकचा हा फोटो संपूर्ण जगभरात प्रकाशित झालाय, जो विविध देशांतील सांस्कृतिक विभिन्नता सादर करतो आहे. राॅयटर्सची छायाचित्रकार लुसी निकोल्सनने यास क्लिक केले होते. त्यांचे म्हणणे होते की, ती त्या फोटोला विसरू शकलेली नाहीये. इजिप्तच्या दोआ एल्गोबाशी (१९) हिजाब घालून फुल ड्रेसमध्ये व्हॉलीबॉल खेळत होती. तथापि जर्मनीची किरा वेल्कनहोर्स्ट (२५) या खेळाच्या पारंपरिक वेशभूषेत होती. या फोटोत दोन खेळाडू, दोन मान्यतांसह, दोन ड्रेस कोडमध्ये मात्र एकच खेळ खेळत होती. त्यांच्यामधील संघर्ष वा एकमेकांविरुद्ध लढण्याच्या संस्कृतीचा नव्हता, तर ओळखीचा होता. या गोष्टींना असे समजून घ्या-

छादिएजा बुज्स (पदवीधर विद्यार्थिनी), इजिप्त :
माझी आई इजिप्तची आहे आणि वडील डच होते. मी चार वर्षांची असताना दोघे वेगळे झाले. मी नेदरलँड्समध्ये लहानाची मोठी झाले. पाच वर्षांपूर्वी जेव्हा मी १९ वर्षांची झाले, तेव्हा आईने दरडावून सांगितले होते की, ही काय बडबड आहे, तू काय करत आहेस? मी आपला देश यासाठी सोडला की तू बंधनात राहावयास नको होते, काय हेच तुमचे स्वातंत्र्य आहे काय? बुज्सने सांगितले, तेव्हा मला वाटले की, काही गोष्टी निश्चितच माझ्यापेक्षा मोठ्या आहेत. मी नमाज पढायला प्रारंभ केला, रोजे ठेवले. मग विचार केला हिजाब घालायला सुरुवात करू. यामुळे अनेक गोष्टी माझ्या नियंत्रणात आल्या आणि चांगले वाटू लागले. एक डच गावात मला हिजाब घातल्यावरुन नोकरी नाही मिळाली. इजिप्तला गेले, तर तेथे मॅक्सी-स्कर्ट घालण्याची परवानगी होती. जी फारच रुंद-घेरदार असते. दिसण्यातही चांगली नव्हती. पण आता सर्व माझ्याकडून आहेत. मी एकाग्र मनाने आपली आस्था, आध्यात्मिकता, प्रार्थना आणि शिक्षणावर लक्ष केंद्रित करू शकते. फ्रान्समध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर आईने सांगितले होते की, हिजाब उतरवून टाक, पण नाही, आता मी त्यासहच मरणे पसंत करीन.

नोरमा मूर (माजी अभिनेत्री), अमेरिका :
मी धार्मिक आहे, पण असे कोणतेच लेबल-शिक्का माझ्याकडे नाहीये जी माझी आस्था प्रदर्शित करू शकेल. मी हे मानते की ईश्वराने मला तयार केले आहे आणि माझ्यात प्रेमही दिले आहे. मी जेव्हा इराणला गेले होते तेव्हा मला हिजाब आणि बेढंगी ट्युनिक घालावे लागले होते. इराण दौऱ्याआधीच मला माहीत होते की, पोशाखात माझे केस, गळा वा पायांच्या पिंडऱ्यादेखील दिसल्या नाही पाहीजे. जर मी तसे केले नसते तर कदाचित अपमान सहन करावा लागला असता वा शिक्षा झाली असती. मी स्वयंसेवक होते. यासाठी तिथल्या अटी आणि शर्तींचा स्वीकार केला. मला आठवते आहे की जेव्हा गरमी फारच होती, मी त्रस्त होऊ लागले. मी त्या घुसमटण्यात जनावर होऊ इच्छित नव्हते. जर मी आपल्या पाळीव प्राण्यांना अशा अवस्थेत पाहिले तर लगेच त्याचे कपडे फाडून टाकेन. मी मानते की, माझे केस, माझे शरीर जे ईश्वराने मला दिले आहे. डोके झाकणे, बेढंगी कपडे घातल्यानंतर मला असे वाटू लागले होते की, मी जणू महिलाच नाहीये. यासाठी मी आपले डोके बिल्कुलच झाकू शकत नाही आणि ईश्वराने मला याप्रति जबाबदार बनविले आहे.
रोजर कोहेन, लेखक व पत्रकार
बातम्या आणखी आहेत...