आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अर्ध्या रिओत ऑलिम्पिक, अर्ध्यात होत आहे टोळीयुद्ध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिओ दि जानेरिओचे कोपाकाबाना किनारा जिथे व्हॉलीबॉलचे सामने होताहेत तो किनारा फारच चर्चेत आहे. पर्यटक आणि दर्शकांची गर्दी तेथे नेहमी दिसते. पण ऑलिम्पिक स्थळांपासून दूर मात्र गोळ्या चालतात. त्यांचा आवाज ऑलिम्पिकच्या उत्साही आवाजात गडबड गोंधळात ऐकूच येत नाहीये. डोंगर टेकड्यांवर वसलेली रिओची वस्ती मात्र टोळीयुद्धात भरडली जात आहे. लोक घराच्या बाहेरही निघू शकत नाहीत. मुलांनादेखील घरातच राहण्यास सांगण्यात आले आहे. ९ वर्षांच्या रिचर्ड डायसला मी जेव्हा पाहिले, तेव्हा तो खूपच घाबरलेला दिसला. अशातच तो आपल्या घराबाहेर गोळीबाराचा आवाज ऐकून जमिनीवर पडून राहिला होता. आईला पाहून तो आईला बिलगला होता. आईने त्याला घराची खिडकीदेखील उघडू नको असे सांगितले आहे. रिचर्डची आई जुसेलिया सिल्वा (वय-३५) सांगते आहे की, आम्ही तर त्या ऑलिम्पिकमध्ये धावणाऱ्या त्या घोड्यांपेक्षाही वाईट स्थितीत आहोत.

मी पाहतो आहे की, रिओत ऑलिम्पिकचे वातावरण जरूर आहे. पण सर्व स्थानिक लोक मुळीच समाधानी-आनंदी नाहीत. अर्धा रिओ ऑलिम्पिकच्या उत्साहात डुबला आहे. किनाऱ्याजवळील वस्ती असलेल्या भागात सैनिक गस्त घालत आहेत. जेणेकरून लोकांमध्ये भीती उत्पन्न होऊ नये. ऑलिम्पिकच्या या वातावरणात टेकड्यांवरील वस्त्यांमधून येणारे गोळ्यांचे आवाज वातावरण गंभीर बनवतात. वस्त्यांमध्ये राहणारी काही लोकसंख्या ऑलिम्पिकच्या आयोजनापासून दूर अंतर राखून आहे. त्यांना खेळाच्या उत्साहापेक्षा अधिक आपल्या जिवाची जास्त पर्वा आहे. गेल्या आठवड्यात अलेमाओ क्षेत्रातील वस्तीमध्ये २०० हून अधिक पोलिस अधिकाऱ्यांनी टोळी युद्धातील युद्धखोरांवर हल्ला केला. त्यामुळे झालेल्या चकमकीत दोन टोळी सदस्य मारले गेले, तथापि उच्चस्तरीय काउंटर-नार्कोटिक्स अधिकारीदेखील गोळी लागून जखमी झाला. अलेमाओच्या वस्तीत साधारणत: ७० हजार लोक राहतात. तिथे गेल्या आठवड्यात दोनदा गोळीबार झाला होता.

टीव्ही वाहिन्यांचे कॅमेरे ऑलिम्पिक स्थळावर आहेत. यामुळे गोळीबारीचे फुटेज टीव्ही वाहिन्यांवर दिसत नाही. तथापि ऑलिम्पिक सुरू होण्यापूर्वी रिओ ऑलिम्पिक समितीचे प्रवक्ते मारिओ आंद्रेडा याने दाव्यानिशी सांगितले होते की, रिओ या वेळी, जगातील सर्वाधिक सुरक्षित शहर आहे, ऑलिम्पिक सुरू झाल्यानंतर अलेमाओ सारख्या क्षेत्रात टोळी युद्धाच्या डझनभर तरी घटना घडल्या आहेत. यामुळे आॅलिम्पिकच्या सुरक्षिततेबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. २००९ मध्ये जेव्हा रिओने ऑलिम्पिकचे यजमानत्व मिळवले होते, तेव्हाच तेथील अधिकाऱ्यांनी टोळी युद्धातील सदस्यांच्या अलेमाओसारखी टेकडीवजा डोंगरी क्षेत्रे चिन्हीत केली होती. २०१० मध्ये सैनिकांनी तिथे चौक्यांचे जाळे विणले होते. पण हा उपाय काहीच काळ कामी आला. २०१४ मध्ये पुन्हा टोळी युद्धखोर आणि पोलिसांमध्ये चकमकी झाल्याचे मुख्य कारणच मुळी मादक पदार्थांची तस्करी हे होते व आजही आहे. रिओच्या टोळी युद्धखोरांची कोलंबियाच्या कोकेन पुरवणाऱ्यांची दीर्घ काळापासून घनिष्ठ संबंध राहिले आहेत. ते रिओच्या अलेमाओसारख्या भागात ते याचा पुरवठा करतात. या कारणामुळे तिथे टोळी युद्धखोरांच्या गटांमध्येदेखील टोळी युद्धे होत.

- ब्राझीलमध्ये सुरक्षेवर संशोधन अभ्यास करणाऱ्या इन्स्टिट्यूट ऑफ आयगेरेपचे संशोधन संचालक रॉबर्ट मुग्गा म्हणतात की,- रिओ हिंसेचा तो टप्पा काळ पाहत आहे, जे अनेक देशांमध्ये सुरूच आहे. अमेरिकन हवाईदलाचे निवृत्त कॅप्टन शेरिल माईकलसन यांनी देखील सांगितले की, अशातच त्या बसमध्ये होत्या. आणि गोळ्या झाडल्याचा आवाज त्यांना आला होता.
- स्थानिक लेखक जोस फ्रंॅकलीन सिल्व्हेराने (वय-५६) रिओच्या सुरक्षेवर द ऑलिम्पिक्स ईन अलेमाओ, ही कविता लिहिली आहे.
सिमॉन रोमेरो (ब्राझील ब्यूरो चीफ)
बातम्या आणखी आहेत...