आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोबोट्समुळे नोकऱ्या धोक्यात; कंपन्यांची एकजूट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जपानमधील एका हॉटेलमध्ये कर्मचाऱ्यांऐवजी रोबोटिक स्टाफ नियुक्त झाल्याची बातमी गेल्या वर्षी ऐकली. तेव्हाच यापासून खूप मोठा धोका असल्याचा संशय आला होता. या हॉटेलमालकाने एक कर्मचारी ठेवून अन्य सर्व कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले होते. त्यानंतर जपानच्या विविध शहरांमधून या रोबोटिक कर्मचाऱ्यांच्या बातम्या येऊ लागल्या. रेस्टॉरंटमध्येही रोबोट स्टाफ वाढू लागला. माणसांसारखेच दिसणारे आणि माणसांच्या तुलनेत काही प्रमाणात त्याच क्षमतेचे काम करणाऱ्या या रोबोट्सचा जपानने सर्वप्रथम उदो उदो करायला सुरुवात केली. त्यानंतर चीन आणि इतर देशांमध्ये हे फैलावत गेले आणि पाहता पाहता हजारो लोकांच्या नोकऱ्यांवर गदा आली. रोबोटसारखे कृत्रिम तंत्रज्ञान आयटी क्षेत्रासाठी नुकसानदायक ठरू शकते. या रोबोट लाटेचे संभाव्य दुष्परिणाम लक्षात घेऊन जगातील पाच आयटी कंपन्या एकत्र आल्या आहेत. ही एकजूट रोबोटिक तंत्रज्ञानापासून कर्मचारी आणि त्यांच्या नोकऱ्यांचा बचाव करेल.
अॅमेझॉन, फेसबुक, गुगल, आयबीएम आणि मायक्रोसॉफ्ट या पाच कंपन्यांनी ही मोहीम उघडली आहे. रोबोट तंत्रज्ञान माणसांप्रमाणे चालू, बोलू, विचार करू शकत आहे. त्यामुळे आपल्या नोकऱ्या संकटात आहेत हे लोकांमधील भय दूर करणे हे या संघटनेचे उद्दिष्ट आहे. या नव्या तंत्रज्ञानाविषयीच्या सरकारी नियमांबाबत कॉर्पोरेट कंपन्यांचे भयही दूर करायचे आहे.

कृत्रिम तंत्रज्ञानावरील सार्वजनिक वाद पेटला असतानाच या पाच दिग्गज कंपन्यांची एकजूट झाली आहे. जागतिक चर्चा आणि वादांमध्ये विविध प्रकारचे रोबोट आणि इंटेलिजंट प्रणालीचे तंत्रज्ञान विकसित करणे, सेल्फ ड्रायव्हिंग कार आणि कार्यस्थळावरील ऑटोमेशन सिस्टिमसारखे मुद्दे समाविष्ट आहेत. या औद्योगिक समूहाने अभियांत्रिकीचा विकास आणि वैज्ञानिक संशोधनासाठी नवी मूलभूत नैतिक मानके तयार केली आहेत. पाचही कंपन्यांनी याला मंजुरी दिली आहे. या पाच कंपन्यांमधील उच्चस्तरीय संशोधकांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. त्यात म्हटले की, सामाजिक आणि आर्थिक फायद्यासाठी हे तंत्रज्ञान जगभरात दबावपूर्वक वापरले जात आहे. तसेच अनेक क्षेत्रांमध्ये या तंत्रज्ञानाचा गैरवापरही होऊ शकतो. तंत्रज्ञान निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी आपल्या नियमांनुसारच या तंत्रज्ञानाचा उपयोग करू नये, तर दुसरीकडे लोकांनीही हे तंत्रज्ञान अधिक चांगल्या प्रकारे समजून कृत्रिम इंटेलिजन्स तंत्रज्ञानविषयक कामे कौशल्याने केली पाहिजेत, असा आमचा उद्देश आहे.

२०१४ या वर्षी गुगलने ‘डीप माइंड’ ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेव्हलपमेंट कंपनी खरेदी केली होती. या कंपनीचे प्रमुख मुस्तफा सुलेमान म्हणतात, अवघ्या जगाला सकारात्मकतेच्या दिशेने पुढे घेऊन जाण्याची क्षमता या तंत्रज्ञानात असायला हवी. सध्या तरी कंपनीचे नवे मॉडेल्स लोकांच्या कसे उपयोगात येतील यावर विचारविनिमय सुरू आहे. नवे मॉडेल म्हणजे ‘उद्योगांमध्ये सहकार्य आणि प्रत्येक कामात पारदर्शकता’ हे कामातही दिसून आले पाहिजे.

या आयटी कंपन्यांच्या समूहाने आठ थेअरीज मांडल्या आहेत. प्रसिद्ध लेखक आयझॅक असिमोव्ह याचा ‘द लॉ ऑफ रोबोटिक्स’वर त्या आधारित आहेत. १९४२ मधील विज्ञानकथांमध्ये त्यांचा उल्लेख आढळतो. नव्या थेअरीजमधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा फायदा अधिकाधिक लोकांना झाला पाहिजे. हे तंत्रज्ञान निर्मिती करताना एक नैतिक नियमावली असणे गरजेचे आहे. उदा. मानवी जिवास धोका पोहोचवू शकणारी शस्त्रे आणि साधनांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा उपयोग अभियंत्यांनी कदापि करू नये. यामुळे मानवाधिकारांचे उल्लंघन होऊ शकते. मायक्रोसॉफ्ट रिसर्चचे व्यवस्थापकीय संचालक एरिक हॉर्विट्ज म्हणतात, मागील चारेक वर्षांत आर्टिफिशियल इंटेलिजन्सबाबतीत जी काही माहिती मिळत आहे त्यामुळे निश्चितच चिंता वाढल्या आहेत. सरकारलादेखील याबाबत चुकीची माहिती देण्यात आली आहे.

अॅपल, रिसर्च लॅबोरेटरीज तसेच ओपनएआयसारख्या संस्था, ज्यांनी अद्याप हे तंत्रज्ञान वापरलेले नाही, त्यांनीदेखील या समूहात सहभागी होऊन आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन संशोधकांनी केले आहे.
© The New York Times
बातम्या आणखी आहेत...