आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रॉयल ब्ल्यू रंगछटांनी खुलून दिसेल वधूचा पोशाख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीतील ताज हॉटेलमध्ये नुकताच कोट्यूर फॅशन वीकचे आयोजन करण्यात आले होते. यात देशातील नामवंत डिझायनर्सनी त्यात लेटेस्ट डिझाइन्स सादर केल्या. फॅशन वीकचा शेवटचा दिवस मनीष मल्होत्रांच्या नावाने गाजला. त्यांच्या संग्रहात 1930 मधील शाही घराण्यांची झलक स्पष्ट दिसून आली.


कोट्यूर फॅशन वीकच्या अंतिम फेरीत डिझायनर मनीष मल्होत्रांनी एकापेक्षा एक डिझाइन्स सादर केल्या. त्यांच्या शोमध्ये चेन्नई एक्स्प्रेस चित्रपटातील अभिनेता, किंग ऑफ बॉलीवूड शाहरुख खान आणि दीपिका पदुकोनने रँप वॉक केला. मनीषच्या डिझाइन्स आणि एम्ब्रॉयडरीमध्ये ‘इंडो-युरोपियन आर्किटेक्चर’ पाहावयास मिळाले. त्या काळी लोकांना सजायला आवडत असे. त्यामुळे शोमध्ये खास कार्यक्रमसाठीचे ड्रेसिंग म्हणजेच रीच फॅब्रिक आणि एम्ब्रॉयडरी पाहावयास मिळाली. कपड्यांवर मेणबत्ती तसेच विविध प्रकारच्या फुलांच्या डिझाइन्स होत्या. भारतीयांचे राहणीमान नव्या ढंगात सादर करण्यासाठी पारंपरिक भारतीय आणि ब्रिटिश संस्कृतीचे कलात्मक पद्धतीने मिश्रण करण्यात आले.


कोट्यूर वीकमध्ये प्रथमच फ्रेंच शू डिझायनर क्रिश्चियन लाउबुटिनने मनीष मल्होत्रा कलेक्शनवर खुलून दिसणा-या काही खास शू-डिझाइन केले. मनीषने सांगितले की, कोट्यूर फॅशन वीकसाठी लाउबुटिनने काही खास डिझाइन तयार केले आहेत. मल्होत्रा कलेक्शनसाठीही मॅचिंग शू डिझाइन्स केले. दीपिका पदुकोनने रॉयल ब्ल्यू लहंग्यात रँप वॉक केले. या ड्रेससोबत तिने घातलेले थ्री-लेयर डायमंड नेकलेस खूप सुंदर दिसत होते.


1930 मध्ये क्रॉस-कल्चरल टायअप पाहावयास मिळाले. त्यामुळे फॅशन आणि संस्कृतीतील अनेक नव्या गोष्टी समोर आल्या. हे परिवर्तन पाहून खूप प्रभावित झाल्याचे मनीष मल्होत्रांनी सांगितले. फॅब्रिक, कपड्याची रचना, डिझाइन तसेच स्टाइलमधून त्यांनी या काळातील स्थापत्यशास्त्र आणि कलाकुसर यांचा मिलाप दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. अँटिक गोल्ड रंगातील एम्ब्रॉयडरीचा लेअर्ड लेहंगा परिधान केलेल्या महाराणीला डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हे कलेक्शन डिझाइन केले. हा ड्रेस तयार करताना त्यांनी वेलवेट, जुन्या काळातील रेशीम तसेच अँटिक गोल्ड एम्ब्रॉयडरी आणि चंदेरी रंगाने कलाकुसर केली आहे. तीच संकल्पना कायम ठेवत रेड, रॉयल ब्ल्यू, ऑलिव्हसारख्या रंगाचा वापर केला आहे. त्यामुळे सध्या लग्नात वधूसाठी रॉयल ब्ल्यू रंगाची फॅशन राहणार आहे.