आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुकच्या न्यूजफीड फीचरची निर्मिती यांचीच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रुची यांच्या वडिलांचा पुण्यात अवजड इंजिनिअरिंग उद्योग आहे. आजोबा स्टेनलेस स्टील व्यवसायात कार्यरत होते. रुची यांनी पदवीनंतर घराचा व्यवसाय सांभाळावा, अशी सुरुवातीस अपेक्षा होती. मात्र, पुरुषांचे वर्चस्व असलेल्या जगात ती कसे काम करेल असे वडिलांना वाटले. विविध क्षेत्रांत पुरुषांपेक्षा सरस कामगिरी करून दाखवण्याचे आश्वासन त्या वेळी त्यांनी वडिलांना दिले. २००५ मध्ये फेसबुकमध्ये आल्या तेव्हा त्या सोशल मीडियातील पहिल्या महिला अभियंता असल्याचे सांगण्यात आले.

फेसबुकमध्ये त्या वेळी केवळ २० जण होते.त्यामुळे ओरॅकलमधून फेसबुकमध्ये येणे धाडसाचे वाटत होते. पदवी शिक्षणानंतर त्यांना वॉल स्ट्रीटवर एका बँकेत काम मिळाले होते. तेथील क्युबिकल्स लहान होते आणि ते त्यांना सोयीस्कर वाटत नव्हते. येलो फीव्हर नकोसा वाटतो, त्यामुळे काम करू शकत नसल्याचे त्यांनी बँकेला सांगितले. बँकेने त्यांचे न ऐकल्याने त्या ओरॅकल कॉर्पोरेशनमध्ये रुजू झाल्या.

फेसबुकमध्ये त्या आपला जुना वर्गमित्र आदित्य अग्रवालशी भेटल्या आणि दोघांत प्रेमसंबंध जुळले. रुची यांनीच फेसबुकच्या न्यूज फीडचे व्हर्जन तयार केले होते. काहींनी त्यास तत्काळ प्रतिसाद दिला, तर काहींनी विरोध दर्शवला. फेसबुकमध्ये काम करत असताना त्यंानी कंपनीतून सहा महिन्यांची सुटी मागितली होती. त्यांनी आईवडिलांना भेटण्याचे कारण दिले. त्याच वेळी आदित्यसोबतच्या डेटिंगला सहा वर्षे झाली होती. आता लग्न करणे आवश्यक झाले हाेते. त्यामुळे दोघे विवाहबंधनात अडकले.

२०१० मध्ये त्या फेसबुकमधून बाहेर पडल्या आणि पतीसोबत कोव नावाची स्टार्टअप सुरू केली. दोन वर्षांतच त्यास २५ कोटी डॉलरमध्ये ड्रॉपबॉक्सने खरेदी केले आणि दोघे पती-पत्नी ड्रॉपबॉक्समध्ये रुजू झाले. रुची ड्रॉपबॉक्सच्या उपाध्यक्ष होत्या. वर्षभरातच येथून बाहेर पडत त्यांनी सल्लागाराची भूमिका स्वीकारली.

- जन्म- २० जानेवारी १९८२
- शिक्षण- कार्नेजी मेलन युनिव्हर्सिटीमधून इलेक्ट्रिकल कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये पदवी व पीजी
- कुटुंब- पती आदित्य अग्रवाल
चर्चेत- त्या नुकत्याच पीटीएममध्ये रुजू
बातम्या आणखी आहेत...