Home | Divya Marathi Special | rush in delhi airport

दिल्लीचे विमानतळ सर्वांत 'बिझी'

अनुप कुमार मिश्र (नवी दिल्ली) | Update - Jun 03, 2011, 06:14 PM IST

मुंबई विमानतळाला मागे टाकत इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ देशातील सर्वांत मोठे विमानतळ बनले आहे.

  • rush in delhi airport

    मुंबई विमानतळाला मागे टाकत इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ देशातील सर्वांत मोठे विमानतळ बनले आहे. एका दिवसात इंदिरा गांधी विमानतळाहून एक लाखापेक्षा जास्त प्रवाशांनी विमान प्रवास केला आहे. आतापर्यंत हे रेकॉर्ड मुंबई विमानतळाच्या नावावर होते.

    मागच्या वर्षी 24 डिसेंबर रोजी एका दिवसात 98,241 प्रवाशांनी मुंबई विमानतळावरून विमान प्रवास केला होता. त्यामुळे मुंबई विमानतळाला सर्वांत जास्त प्रवाशांनी व्यग्र विमानतळ, असे घोषित करण्यात आले होते. मात्र, आता 8 मे 2011 रोजी इंदिरा गांधी विमानतळ विभाग 1 व विभाग 3 येथून 1,04,198 प्रवाशांनी विमान प्रवास केला. त्यानंतर देशातील सर्वांत जास्त व्यग्र विमानतळ म्हणून इंदिरा गांधी विमानतळाला घोषित करण्यात आले. आतापर्यंत इंदिरा गांधी विमानतळाहून रोज 80 ते 85 हजार प्रवाशांचा प्रवास होतो. विमानतळाच्या वरिष्ठ अधिका:यांच्या मते इंदिरा गांधी विमानतळाच्या विभाग एक आणि विभाग तीनवरून खासगी विमानांचा प्रवास होतो. येथून जवळपास 40 हजार प्रवाशांचा प्रवास होतो. यात साधारण 18,500 विमान प्रवासी खासगी विमानांनी रवाना होतात आणि साधारण 16,000 विमान प्रवाशांचे रोज या विमानतळावर आगमन होते. अशा प्रकारे या विभाग तीन येथून रोज 17,000 प्रवासी परदेश प्रवासासाठी निघतात, तर 18,500 प्रवासी खासगी विमानाने येथून प्रवास करतात. सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा अधिका:यांच्या संख्येत वाढ करण्यात आल्याचेही विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले. कर्मचा:यांची संख्या वाढवण्यात आल्याने आता प्रवाशांना सुरक्षा तपासणीसाठी कमीत कमी वेळ द्यावा लागेल, असेही त्यांनी सांगितले.

Trending