आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियाच्या पावित्र्याने अमेरिकेचे मित्र चिंतित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात मोंटेनेग्रो या छोट्याशा बाल्कन देशामध्ये झालेला अयशस्वी विद्राेह ही आठवण करून देतो की, युरोपासाठी एका नव्या लढाईस सुरुवात झालेली आहे. मोंटेनेग्रो हा देश अमेरिकन  नेतृत्वाच्या  सैनिक आघाडी असलेल्या नाटोमध्ये सामील होण्यासाठी जात आहे. मोंटेनेग्रोच्या संसदेवर हल्ल्याच्या कटाचे सूत्रधार म्हणून रशियन गुप्तहेर विभागाचे दोन संशयित एजंट सांगितले जातात.   

रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतीन बाल्टिकपासून  बाल्कन आणि काळ्या समुद्रापासून ते ब्रिटनपर्यंत रशियाचे साम्राज्य निर्माण करू इच्छित आहेत.  २९ जानेवारी ते ३ फेब्रुवारीपर्यंत रशियाच्या समर्थक फौजांनी युक्रेनमध्ये युरोप समर्थक सरकार नियंत्रित जागांवर जबरदस्त हल्ले केले होते.
 
याच बरोबर पुतिन यांनी एस्तोनिया, मोल्दोवा आणि  पूर्व कम्युनिस्ट देशांच्या लोकतांत्रिक सरकारांविरोधात आंदोलन छेडले होते. त्यांनी  फ्रान्स, जर्मनी, हंगेरी तसेच अन्य युरोपीय देशांमध्ये राष्ट्रवादी आणि युरोपियन युनियन विरोधी शक्तींशी युती केल्याचेही लक्षात आले. 
या नव्या संघर्षाचा सर्वात महत्त्वाचे केंद्र म्हणजे व्हाइट हाऊस आहे.
 
डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या तीन महिन्यांत या मुद्द्यावर चर्चा झालेली आहे काय, की पुतिन यांच्या नव्या  माहिमेला अमेरिकेने विरोध केला पाहिजे, किंवा  किंवा पूर्व युरोपाचे एक क्षेत्र रशियासाठी सोडावे? या बदल्यात रशिया इसिस या दहशतवादी संघटनेच्या विरोधात कारवाईसाठी अमेरिकेशी युती करेल, तसेच अण्वस्त्रे आणि चीनवर नियंत्रण ठेवण्यास सहकार्य करेल?   

डोनाल्ड ट्रम्प हे अशा  सौदेबाजीचे संकेत देऊन चुकले आहेत. त्यांचे काही वरिष्ठ सल्लागार  याच मताचे आहेत. तथापि, संरक्षणमंत्री जेम्स मेटिस, विदेश मंत्री रेक्स टिलरसन या कराराच्या विरोधात आहेत. पूर्व युरोपातील लोकशाहीवादी देशांसदर्भात अमेरिकेने जे अनिश्चित धोरण आखले आहे त्यामुळे नवी समस्या निर्माण झालेली आहे.
 
बल्गारिया आणि  मोल्दोवा या देशांचे नेते यांचे धोरण मास्कोच्या बाजूने आहे. निवडणुकीच्या अगोदर या वर्षी फ्रान्स, जर्मनीमध्ये युरोपियन युनियन विरोधी उमेदवारांना रशियाच्या समर्थनामुळे अमेरिकेच्या पारंपरिक सहकाऱ्यादरम्यान चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. 
कार्नेगी एनडोमेंटच्या ताज्या अहवालात सागितले गेले आहे की, दुसऱ्या महायुद्धापासून अमेरिका आणि त्यांच्या युरोपियन मित्रांनी जे अांतरराष्ट्रीय उदार धोरण कायम ठेवले आहे,
 
तिला आता धोका निर्माण झालेला आहे. तथापि अमेरिकेने परंपरागत उपाय अवलंबले आहेत. ट्रम्प यांच्या शपथ ग्रहणापूर्वी एक आठवडा अगोदर ४००० अमेरिकन सैनिक पोलंड पोहोचले हाेते. पण पुतिन यांनी मध्य आणि पूर्व युरोपात आपल्या प्रभाव वाढवण्याचे प्रयत्न काही सोडलेले  नाहीत. पुतिन यांनी पश्चिमेकडील उदार धोरणंच्या जागी आक्रमक राष्ट्रवादाचा ब्रँड प्रस्थापित केला आहे. 
बातम्या आणखी आहेत...