आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Poilat And Sara Abdullah Love Story For Valentine Day.

फारुख अब्दुल्ला ते सचिन पायलट; वाचा, अब्दुल्ला फॅमिलीतील तीन 3 लव्हस्टोरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सचिन व सारा पायलट - Divya Marathi
सचिन व सारा पायलट
जम्मू-काश्मीरमधील अब्दुल्ला फॅमिली. देशाच्या राजकारणात अब्दुल्ला फॅमिलीला चांगले वजन आहे, तितक्याच या फॅमिलीतील सदस्यांच्या लव्हस्टोरीही इंट्रेस्टिंग आहेत. मग त्याला, फारुख अब्दुल्ला हेच काय तर त्यांची कन्या सारा या देखील अपवाद नाहीत.

'व्हॅलेंटाइन वीक'निमित्त आम्ही आपल्यासाठी अब्दुल्ला फॅमिलीतील तीन लव्हस्टोरी घेऊन आलो आहे. अब्दुल्ला फॅमिलीतील सर्वाधिक चर्चेत राहिली ती म्हणजे सारा अब्दुल्ला व सचिन पायलट यांची लव्हस्टोरी. त्यामागील मुख्य कारण म्हणजे, सारा या मुस्लिम तर सचिन हे हिंदु.
अशी सुरु झाली लव्हस्टोरी...
सचिन व सायाची विदेशात झालेली भेट प्रेमात कशी बदलली हे दोघांनाही कळले नाही. दोघांनी विवाह निर्णय घेतला. सारा या एक नव्हे, दोन नव्हे तर तीन मुख्यमंत्री बनलेल्या कुटुंबातील कन्या. सचिन हे देखील राजकीय घराण्यातील चिरंजिव आहे. तरीही, या प्रेमीयुगुलांना अडसर ठरली ती धर्माची भिंत.

सारा- सचिनच्या प्रेमाच्या विरोधात होती अब्दुल्ला फॅमिली....
सारा या जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या भगिनी आहेत. विदेशात शिक्षणासाठी गेलेल्या सारा व सचिन पायलट यांच्या पहिल्या भेटीतच प्रेम फुलले. मात्र, ओमर अब्दुल्ला यांची फॅमिली सचिन व साराच्या विवाहाच्या विरोधात होते. सचिन यांनी त्यांच्या आई-वडिलांचा विवाहाला होकार मिळवला होता. मा‍त्र, सारासाठी आपल्या भावाला राजी करणे फारच अवघड झाले होते. घरच्यांचा विरोध पत्करून या प्रेमीयुगुलाने जानेवारी 2004 मध्ये साध्या पद्धतीने विवाह केला. अब्दुल्ला फॅमिलीतील एकही सदस्य या विवाह समारंभात सहभागी झाले नव्हते.

विवाहानंतर सचिन यांनी राजकारणात पदार्पण केले.सचिन वयाच्या 26 व्या वर्षीच दौसा लोकसभा मतदान संघातून मोठा विजय प्राप्त केला. तेव्हा कुठे विवाहाला विरोध करणार्‍या फारुख अब्दुल्ला यांनी मुलगी व जावईचा स्विकार केला.
पुढील स्लाइडवर वाचा, एका हॉटेलमध्ये सुरु झाली ओमर अब्दुल्लांची लव्हस्टोरी.