आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पगार वाढवण्यापूर्वी योग्य अभ्यास केल्याने फायदा होईल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पगार वाढवण्यासाठी किंवा प्रमोशनविषयी तुमच्या मॅनेजरशी बोलण्यापूर्वी तुमच्या कामाचे स्वरूप आणि स्वत:चे महत्त्व जाणून घेणे आवश्यक आहे. पुढील दोन उदाहरणांवरून हे सहजपणे लक्षात येईल.

एक - नवे पद किंवा स्थानावर पगार वाढवण्याविषयी आणि दोन - जुन्या पदावरून मॅनेजरसोबत चर्चेच्या आधारे. नव्या पदाविषयी बोलताना आधी मॅनेजरला बोलू द्या. जेव्हा तो पैशांचा विषय काढेल तेव्हा सांगा की, त्या पदानुसार आणि पॅकेजनुसार जेवढे पैसे मिळायला पाहिजेत तेवढे पुरेसे आहेत. तसेच कामासंबंधी जबाबदार्‍या आणि आव्हानांविषयी जाणून घेण्याची तुमची इच्छा आहे, असे दर्शवा. पगाराविषयी नंतर बोलू, असेही म्हणा.

तुम्ही पगारावर अभ्यास केल्यानंतर जी पगार मर्यादा ठरवून दिली आहे, त्याविषयीही बोलू शकता. तुम्ही पगारावर समाधानी नसाल तर सांगा की, तुम्हाला विचार करण्यासाठी थोडा वेळ पाहिजे. त्यामुळे मॅनेजर ऑफर लेटरमध्ये लिहिलेला पगार वाढवू शकतो. तुम्हाला पदामुळे अडचण असेल तर ‘नकार’ द्या. तुम्ही एखाद्या पदासाठी एकदा तयार झालात तर तुम्हाला तेच जॉब प्रोफाइल फॉलो करावे लागेल. तुम्हाला जुन्या जॉब प्रोफाइलमध्येच पगारवाढ करून हवी असेल तर त्याची तयारी आधीपासूनच करा. त्यासाठी पगारावर अभ्यास करा. जसे की इतर कंपन्यांमध्ये तुमच्याच पदावर काम करणार्‍या अन्य कर्मचार्‍यांना किती पगार मिळत आहे? तुम्ही जे काम करत आहात त्यासंबंधी परफॉर्मन्स अप्रेझल डॉक्युमेंट बनवा. कॉम्पेन्सेशनसंबंधीची कंपनीची पॉलिसीदेखील वाचा.

पगारवाढीविषयी चर्चा करण्यापूर्वी तुम्हाला नेमके काय हवे आहे, ते माहीत असायला पाहिजे. पगारवाढीविषयी मॅनेजरशी बोलण्यापूर्वी तुमच्याकडे पगार वाढवण्यासाठीची ठोस कारणे असायला हवीत. या विषयावरील तुमची भूमिका प्रयत्नपूर्वक लवचिक ठेवा. तुमच्या प्रस्तावावर मॅनेजरने लगेचच निर्णय दिला पाहिजे, असा आग्रह धरू नका. याविषयी मॅनेजरला मनुष्यबळ विभाग किंवा दुसर्‍या मॅनेजरशी बोलावे लागेल. कंपनीकडे जास्त पगार देण्यासाठी बजेट नसेल तर तुम्हाला तीच नोकरी करायची आहे किंवा दुसरे प्रोफाइल निवडायचे आहे, याविषयीचा निर्णय घ्या.

विक्रम छाछी
ईव्हीपी, डीएचआर इंटरनॅशनल,
मुंबई