आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पगार वाढवण्याचा एक नवा फंडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

48.9% : वेतनवाढ सीईओने जर कंपनीचा नफा वाढवण्यासाठी काही केले आहे, असे भागधारकांना वाटले तर केली जाऊ शकते. परंतु एखाद्या सीईओमुळे कंपनीचा नफा कमी झाला तर त्याच्या वेतनावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या वॉर्टन स्कूलचे लुसियन ए. टेलर यांनी ही माहिती दिली. त्यासाठी त्यांनी 4500 मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांचे अध्ययन केले आणि वेतनवाढीसंबंधातील ही माहिती प्रकाशात आणली.
(स्रोत : पेनसिल्व्हेनिया विद्यापीठ)

जर्मनीमध्ये छोट्या नोकर्‍यांची रेलचेल
5 पैकी 1 : जर्मनीची अर्थव्यवस्था भक्कम आहे. त्यामुळे अनेक छोट्या नोकर्‍या मिळू लागल्या आहेत. घरी राहणार्‍या आई-वडिलांना घर बसल्या करून द्यायचे काम मिळू लागले आहे. त्यातून ते दरमहा 600 डॉलर (सुमारे 33 हजार रुपये) कमावू लागले आहेत. हे उत्पन्न करमुक्त आहे. सुमारे 74 लाख लोक किंवा 5 वर्किंग जर्मन्सपैकी एकाकडे अशा प्रकारचे काम येते. त्याशिवाय हॉटेल, दवाखाने इत्यादींचे अर्धवेळ कामही येते. वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये हा अहवाल देण्यात आला आहे.

कार दुरुस्तीतही मागा सूट!
35% : ज्या महिला कार दुरुस्तीसाठी देतात, त्या घासाघीस करून हमखास डिस्काउंट म्हणजे सूट मागतातच. दुरुस्तीसाठी गॅरेजवाल्याकडून जी रक्कम सांगितली जाते ती 6 टक्क्यांनी वाढवून सांगण्यात आलेली असते, असे निदर्शनास आले आहे. नॉर्थवेस्टर्न विद्यापीठाच्या केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंटचे मेगन बुसे यांच्या नेतृत्वात झालेल्या अध्ययनात ही बाब समोर आली आहे. ज्या महिला सूट मागतात, त्यापैकी 35 टक्के महिला ती मिळवण्यात यशस्वी होतात. त्या तुलनेत केवळ 25 टक्के पुरुषच सूट मिळवण्यात यशस्वी होतात.
(स्रोत : नॉर्थवेस्टर्न विद्यापीठ)