आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sambhaji Maharaj Was A True Emperor, Mercilessly Killed By Mughals

डोळे काढले, जीभ कापली, कातडी सोलली, वाहले रक्ताचे पाट तरी झुकला नाही छावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो. - Divya Marathi
फाईल फोटो.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि बाजीराव पेशवे मराठा सम्राज्याचे महानायक होते. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. संभाजी महाराजांनी त्याचे रक्षण केले. प्रसंगी प्राणांची आहुती दिली. बाजीरावांनी स्वराज्याचा मोठा विस्तार केला.
छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा 7 एप्रिल रोजी बलीदानदिन आहे. मेहुण्‍याने दगाफटका केल्याने त्यांचा अतिशय वेदनादायी मृत्यू झाला. बलीदानदिनानिमित्त आम्ही घेऊन आलोय, त्यांच्या आयुष्याशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती. त्यातून त्यांच्याविषयी पसरविण्यात आलेल्या अफवा, गैरसमज कुठल्या कुठे विरुन जातील.
संभाजीराजांचा राज्‍याभिषेक 16 जानेवारी 1681 रोजी झाला. आपल्‍या नऊ वर्षांच्‍या कारभारात संभाजीराजांनी अतुलनीय कामगिरी केली. छत्रपती संभाजी राजांचा राज्‍याभिषेक झाल्‍यानंतर स्‍वराज्‍याला अधिकच बळकटी आली. स्‍वच्‍छ प्रशासन, उत्‍तम कारभार, दृढ निश्‍चय, अद्‌भुत आणि अचाट धैर्यशिलतेसाठी छत्रपती संभाजी महाराजांना ओळखले जाते. संभाजी राजांनी नऊ वर्षांत 240 लढाया लढल्‍या. संभाजीराजे दिवसाच्या 24 पैकी 20 तास घोड्यावर असत.
संभाजी राज्‍यांनी पत्नीला प्रशासकीय हक्क, अधिकार, स्वतंत्र शिक्का देऊन राज्य कारभार करायला प्रोत्साहन दिले. स्वराज्याचा स्वतंत्र दारूगोळा कारखाना काढला. तरलता तोफखाना काढला. जंजिऱ्याजवळ पूल बांधला. नवी गावे वसवली. व्यापारी पेठा वसवल्या. धरणे बांधली. लढाईमुळे विस्थापित झालेल्यांचे पुनर्वसनही केले. आरमार वाढवून दर्यावर हुकमत निर्माण केली. चार नवे किल्ले बांधले. पराक्रमी सैनिकांना बक्षिसे दिली. लढाईत मारल्या गेलेल्यांच्या कुटुंबांची सोय केली. सैन्यदल अफाट वाढवले.
तंजावर (कर्नाटक), मद्रास (मदुराई), पावणकोट, त्रिचनापल्ली (तमिळनाडू), पाटणा (बिहार), बंगालपर्यंत फौजा घुसवल्या. खजिना दुप्पट केला. शिवाजी महाराजांच्या राज्याचा विस्तार पाच हजार किलोमीटरपर्यंत वाढवला. हे सारे करण्यास त्यांना केवळ नऊ वर्षे मिळाली (जानेवारी, इ.स. 1681 - मार्च 11, इ.स. 1689), त्‍यांचा कार्यकाळ अतुलनीय असाच आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, संभाजी राजांचा अतुलनिय इतिहास... संभाजी राजांचे डोळे काढले, जीभ कापली, कातडी सोलली तरी धर्म सोडला नाही.... शरण गेले नाही... वाचा अंगावर काटा उभा करणारी सत्यकथा.....
(टीप- ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून संभाजी राजांबद्दल असलेले गैरसमज दूर करा.)