आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संविधान आजपासून राज्यसभा टीव्हीवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या जन्माआधीची कहाणी, एक सार्वभौम प्रजासत्ताक देश आकाराला येत असतानाची प्रक्रिया, देशाची राजकीय चौकट, वैयक्तिक, राज्याच्या हक्कासंदर्भासाठी ज्या भारतीय राज्यघटनेचा दाखला दिला जातो, त्या राज्यघटनेच्या निर्मिती प्रक्रियेवर आधारित ‘संविधान’ मालिका आजपासून राज्यसभा टीव्हीवर सुरू होत आहे. अभिनेता सचिन खेडेकरने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची व्यक्तिरेखा साकारली आहे.

मालिकेत साधारण 150 कसदार अभिनेत्यांनी विविध व्यक्तिरेखा निभावल्या आहेत. यामध्ये टॉम अल्टर मौलाना अबुल कलाम आझाद, नीरज कबी महात्मा गांधी, दलीप ताहिल पंडित नेहरू, उत्कर्ष मजुमदार सरदार वल्लभभाई पटेल, राजेंद्र गुप्ता डॉ. राजेंद्र प्रसाद, तर नरेंद्र झा हे कायदे आझाम महंमद अली जिना यांची व्यक्तिरेखा साकारणार आहेत. हल्ली संसदेतील केवळ गोंधळाचीच स्थिती अनुभवणार्‍या नागरिकांसाठी या मालिकेतून चांगल्या चर्चा बघायला मिळतील.

दर रविवारी सकाळी दहा वाजता प्रसारण
1988 मध्ये दूरदर्शनवर ‘भारत एक खोज’ आणणारे निर्माते, दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी ‘संविधान - द मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया’चे दिग्दर्शन केले आहे. 10 भागांची ही मालिका रविवारी सकाळी 10.00 आणि त्याच दिवशी रात्री 10.00 वाजता पुनर्प्रक्षेपित होणार आहे. राज्यसभा टीव्हीने त्याची निर्मिती केली आहे. मालिकेसाठी शमा झैदी आणि अतुल तिवारी यांनी लेखन केले आहे.