आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळ्यात सँडलची स्टाइल बदलून मिळवा नवा लूक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज्ड हील्स : बळकटपणा आणि सुंदर डिझाइनमुळे केज्ड हील्स आधुनिक तरुणींसाठी अगदी योग्य आहेत. हे सँडल पूर्र्ण पाय कव्हर करत असल्याने स्मार्ट लूक मिळतो. हे सँडल्स वापरणार असाल तर पोशाख साधा असावा. हे सँडल तयार करताना मेटॅलिक चमक असलेल्या रंगांचा वापर केल्यास अ‍ॅडव्हेंचरस लूक मिळेल. या सँडलचे स्ट्रॅप्स चांगले दिसतात; पण स्ट्रॅपची रुंदी खूप जास्त किंवा खूप कमी नसावी. अभिनेत्री अनुष्का शर्माने मिडनाइट ब्ल्यू कपड्यांसोबत काळ्या रंगाच्या केज्ड हील्स घालून त्या पुन्हा चर्चेत आणल्या आहेत.

पंप्स : हे प्रोफेशनल सँडल्स आहेत. ऑफिस ड्रेस किंवा पेन्सिल स्कर्टवर हे स्लिम हील्स सुंदर दिसतात. अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी हिने काही दिवसांपूर्वी पार्टी ड्रेसवर ब्राइट पिंक रंगाचे पंप्स घातले होते. हीलची उंची कमी असल्याने चालणे सोपे असते. ऑफिसमध्ये वेगळे दिसण्यासाठी काळ्या किंवा तपकिरी रंगाचे पंप्स वापरता येतील. बिझनेस मीटिंग्जसाठी लेदर पंप्स चांगले दिसतील.

टू- टोन्ड हील्स : सुषमा आणि समीरा या रेड्डी भगिनींना फॅशनसंदर्भात निरनिराळे प्रयोग करणे आवडते. नुकतेच या दोघींना 1930च्या टू टोन्ड हील्स घातले होते. लेदर, लीनन, कॅनव्हास अशा इंटरेस्टिंग फॅब्रिकचा वापर या सँडलमध्ये करता येईल. या सँडलची बॉडी आणि हील या दोन्हीचा रंग निराळाही ठेवता येईल. उदाहरणार्थ लाल रंगाच्या बॉडीवर काळ्या हील्स किंवा काळपट बॉडीवर पांढ-या हील्स आकर्षक दिसतील. इतर महिलांचे लक्ष वेधून घेण्यासाठी स्ट्रॅप्समध्ये हिरव्या आणि बॉडीमध्ये काळ्या रंगाचा वापरही करता येईल. चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुलगी आलिया भट्ट हिने गुलाबी रंगात टू टोन्ड हील्स पसंत केल्या.

पीप टोज : या सँडल्स वापरल्याने थकवा येत नाही. हेच यांचे वैशिष्ट्य आहे. या सँडलमधून पायांच्या बोटांना लावलेले लाल नेलपॉलिश सहज दिसते. अभिनेत्री जेनेलिया डिसुझा हिने गुलाबी रंगाच्या कपड्यांसोबत क्लासिक व्हाइट पीप टोज घातले होते. सिंपल, प्लेन आणि कमी उंचीच्या हील्स असलेले हे सँडल तुम्ही ऑफिसमध्येही वापरू शकता. पार्टी लूक हवा असेल, तर हील्स उंच असाव्यात. लेस ड्रेसवर या सँडल्स सुंदर दिसतील. अभिनेत्री नेहा धुपियाने ब्लॉक हील्सचे पीप टोज सँडल फिकट रंगाच्या ड्रेसवर घालून नवाच ट्रेंड आणला आहे.

कीटेन हील्स : अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांच्यामुळे कीटेन हील्स प्रसिद्ध झाल्या. फ्लोरल ड्रेसवर हे सँडल अधिक छान दिसतात. हे हील्स आरामदायक आहेत. चालताना काही त्रास होत नाही. हे हील्स क्रॉप्स पँट्स किंवा सेक्विन्स ड्रेसवर वापरता येतात. उंच महिलांना हे सँडल्स अगदी छान दिसतात.
अस्मिता अग्रवाल
20 वर्षांपासून फॅशन रायटिंगमधील बहुचर्चित नाव, नवी दिल्ली