आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जग बदलायला निघालीय सँडबर्ग

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फेसबुकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) शेरिल सँडबर्ग यांना प्रथम पाहिल्यावर तुम्हाला असे वाटेल की, त्या बॉसी (हुकूमत गाजवणार्‍या) आहेत; परंतु वास्तवात असे नाही आणि सॅँडबर्ग यांनाही तसे वाटत नाही. 359 कोटी रुपयांच्या कंपनीत इतक्या मोठ्या पदावर कार्यरत असताना जबाबदारी घेणे आणि ती पूर्ण करणे हे त्यांचे काम आहे. परंतु 43 वर्षांच्या सँडबर्ग यांची कार्यशैली पाहिल्यावर असे वाटते की त्यांचा जन्मच जणू इतक्या वयाच्या असताना झालाय. त्यांच्या कुटुंबीयांच्या मते, सॅँडबर्ग लहानपणी स्वत: कधी खेळत नसत. त्या दुसर्‍या मुलांच्या खेळाला एकत्रित करत. त्यांचे हेच वैशिष्ट्य आता त्यांच्या स्वभावाचा एक भाग बनले आहे. त्यामुळे फेसबुकच्या जबाबदार्‍या त्यांच्यासाठी कोणतेही आव्हान नाही. आता त्यांनी एक नवीन अभियान सुरू केले आहे, सत्ता संतुलनात परिवर्तनाचे. त्यांचे पहिले पुस्तक ‘लिन इन’च्या माध्यमातून त्या महिलांना त्यांच्या करिअरमध्ये प्रगती करणे, कॉर्पोरेट कामात आपली भागीदारी वाढवणे आणि बॉस बनण्याचे आव्हान पेलण्यासाठी प्रेरित करतात.

महिलांनी स्वीकारावी जबाबदारी
‘वुमन अँड वर्क’च्या सातत्याने सुरू असलेल्या वादासंबंधी एका गटाच्या मते, लिंगव्यवस्थेच्या संघर्षात महिला पुढे आहेत. पण दुसर्‍या गटाचे म्हणणे आहे की, महिलांना नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा त्याग करावा लागेल. सॅँडबर्ग यांचे मत या दोघांपेक्षा वेगळे आहे. त्यांच्या मते, कामाच्या ठिकाणी महिलांच्या पिछाडीचे कारणही त्या स्वत:च आहेत. महिला आपल्यासाठी मोठे ध्येय निश्चित करत नाहीत आणि आपल्या कर्तृत्वाला कमी लेखतात. त्या आपला नवरा आणि मुलांसाठी आपले करिअरही प्रसंगी दुर्लक्षित करतात. जबाबदार्‍या स्वीकारण्याची वेळ आल्यावर त्या पुढाकार घेत हातही वर करत नाहीत. यातून त्यांच्यातील आत्मविश्वासाची कमतरता स्पष्टपणे जाणवते. सॅँडबर्ग यांनी आपल्या अभियानाला बळकटपणे पुढे नेण्यासाठी लिनइन डॉट ओआरजी नावाच्या एका फायदा न उचलणार्‍या फाउंडेशनचीही सुरुवात केली आहे. फाउंडेशन कॉर्पोरेट भागीदारी, ऑनलाइन सेमिनार आणि मार्गदर्शनाच्या माध्यमातून अभियानासाठी पाठिंबा मिळवेल. सॅँडबर्ग स्त्री-पुरुष समतावादाच्या स्वरूपाला बदलण्यात आणि लिंगव्यवस्थेतील संघर्षाला एक नवीन दृष्टिकोन देण्याकडे मार्गक्रमण करीत आहेत आणि त्यांची प्रतिष्ठा त्यांना या अभियानात यशस्वीही करू शकते. त्या जगातील सर्वात मोठे मानवी जाळे असणार्‍या कंपनीच्या सहसंचालिका आहेत. (फेसबुकचे अंदाजे एक अब्ज युजर आहेत, ज्यात अधिकांश महिला आहेत.) याशिवाय त्यांच्याकडे कोट्यवधी डॉलरची मालमत्ता आहे आणि कामांना पूर्ण करण्याचे त्यांचे अत्यंत प्रभावी रेकॉर्ड आहे.

प्रत्येक काम करण्यात सक्षम
44 वर्षांपूर्वी लॉरेना वीक्स नागरी अधिकार कायद्याच्या साहाय्याने बढती मिळवणार्‍या पहिला महिला बनल्या होत्या. तरीही आजपर्यंत आपण स्त्रिया आणि यश या वादातच का अडकलोय? मार्गारेट थॅचर (एका मोठ्या पाश्चात्त्य लोकशाही देशाच्या पंतप्रधान), इंदिरा नूयी (जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एका कंपनीच्या प्रमुख), बिली जीन किंग (अ‍ॅथलिट), आन डनवुडी (लष्करात फोर स्टार जनरल) आणि हिलरी क्लिंटनसारख्या महिलांनी हे सिद्ध केले आहे की, महिला प्रत्येक जबाबदारी स्वीकारण्यात सक्षम आहेत. परंतु उच्च पद मिळवण्यापासून त्या दूर राहतात. तरुण महिला एक्झिक्यूटिव्ह सुरुवात तर आपल्या पुरुष सहकार्‍यांप्रमाणेच करतात; परंतु असे वाटते की पुढे ते वेगळ्या वाटेवर चालतात. मागच्या तीन दशकांत कॉलेजमधून पुरुषांच्या तुलनेत महिलाच अधिक संख्येत ग्रॅज्युएट झाल्या. शैक्षणिक यशस्वितेचा परिणाम व्यवसाय किंवा राजकारणात दिसून येत नाही. जगभरात 195 देशांपैकी केवळ 17 मध्येच महिला राष्ट्राध्यक्ष आहेत. 20 टक्के संसद सदस्य आहेत, फॉर्च्यूनच्या 500 कंपन्यांमध्ये जवळपास 4 टक्केच महिला प्रमुख आहेत आणि त्यांच्या संचालक मंडळात 17 टक्के महिला सदस्य आहेत. सॅँडबर्ग यांच्या मते, महिलांना कोणत्याही क्षेत्रात उच्च पदावर पोहोचता येत नाही. पुरुषच या जगाला चालवत असल्याचे जेव्हा मी म्हणते, तेव्हा लोक उलट प्रश्न करतात. वास्तवात असे आहे का? ही आणखी एक मोठी समस्या आहे.

विचारसरणीच मोठी अडचण
शिक्षण पूर्ण केल्यानंतर कॉर्पोरेट कंपन्यांत उच्च पदावर पोहोचण्याआधीच महिला रस्ता भटकतात आणि याची अनेक कारणे आहेत. मॅटर्निटी लीव्हशी निगडित कायदा याचे एक मोठे कारण आहे. मुलांना जन्माला घालण्याचे वयही जवळपास तेच असते, ज्या वयात भविष्यातील एक्झिक्युटिव्हला दैनंदिन कार्यांपासून वेगळे केले जाते. कॉर्पोरेट मंडळात पुरुषांचे वर्चस्व आहे. घरातील जबाबदारी इतर कुणीतरी सांभाळत असेल. याच आधारावर अमेरिकेत वर्कर्स डेज निश्चित केले जातात. घरातील कामे, जेवण तयार करणे आणि मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी अजूनही महिलांच्या खांद्यावर आहे. परंतु महिलांची विचारसरणीच सर्वात मोठी अडचण असल्याचे सॅँडबर्ग यांना वाटते. त्या लिहितात की, महिला उच्च पदावर पोहोचण्यासाठी ध्येयच निश्चित करत नाहीत.

ध्येय निश्चित करा
लहानपणापासूनच महिलांना वेगळ्या प्रकारच्या ध्येयाने प्रेरित केले जाते. हा महत्त्वाकांक्षेतील पोकळपणा आहे, जो त्यांच्या प्रगतीतील सर्वात मोठा अडसर आहे. तरीही सॅँडबर्ग म्हणतात की, या अंतर्गत अडचणींचा सामना करणे फार कठीण काम नाही आणि याची सुरुवात आतापासूनच केली जाऊ शकते.

स्त्रियांच्या महत्त्वाकांक्षांचे स्वरूप पुरुषांपेक्षा वेगळे असते, या शोधालाही सॅँडबर्ग फारसे महत्त्व देत नाहीत. त्या म्हणतात की, बदललेल्या परिस्थितीत स्वत:तही परिवर्तन करावे लागेल. सँडबर्ग यांना विरोधकांच्या टीकेलाही तोंड द्यावे लागत आहे आणि मोठ्या प्रमाणावर महिलांचाही समावेश आहे. त्यांच्या मते, सॅँडबर्ग अशा बाबींवर बोलू शकतात कारण त्यांच्याकडे हार्वर्ड विद्यापीठाच्या दोन पदव्या, सीईओ पती, मुबलक मालमत्ता, उच्च पद आणि व्यावसायिक पार्श्वभूमी आहे. परंतु सामान्य महिलांकडून अशा प्रकारची आशा करणेही चुकीचे आहे. एका ग्लोबल मॅनेजमेंट कंपनीचे सीईओ अविवा व्हिटेनबर्ग-कॉक्स सांगतात की, सॅँडबर्ग यांचे महिलांनी यशासाठी पुरुषांसारखे झाले पाहिजे असे म्हणणे म्हणजे महिलांसाठीच अपमानास्पद आहे.

खरे तर, सॅँडबर्ग असे म्हणतच नाहीत आणि त्या स्वत:ही अशा नाहीत. सॅँडबर्ग यांच्या यशाचे रहस्य त्यांची जबरदस्त संघटनक्षमता आणि संघटन पुढे नेण्याची पद्धत हीच महत्त्वाची आहे. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग म्हणतात, कंपनीच्या व्यवसायाचा भाग सॅँडबर्ग यांनीच तयार केला आहे. 2008 मध्ये त्या कंपनीत रुजू होण्यापूर्वी फेसबुकचे सात कोटी युजर्स आणि उत्पन्न 815 कोटी रुपयांच्या जवळपास होते. आज फेसबुकचे जवळपास एक अब्ज युजर्स आहेत आणि एक तिमाही उत्पन्न जवळपास 86.42 अब्ज रुपये आहे.