आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विदेश सोडून देशाला दिले प्राधान्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुटबॉलवर कधी प्रेम जडले हे संदेशला माहित नाही. मात्र, वयाच्या चौदाव्या वर्षांपासून फुटबॉल खेळत असल्याचे तो अंदाजे सांगतो. खेळायला सुरुवात केली नाही तोच एकेदिवशी प्रशिक्षकाने तो या खेळालायक नसल्याचे संदेशला म्हटले. किशोरवयीन संदेशला याची चीड आली. त्यानंतर भरपूर सराव केला आणि आपणही चांगल्याप्रकारे फुटबॉल खेळू शकतो, हे प्रशिक्षकास जाऊन सांगितले. चंदिगडच्या सेंट स्टीफन महाविद्यालयाचा पदवीधर असलेल्या संदेशला दुखापतीमुळे वर्षभर पलंगावरच राहावे लागले.

२०११ पासून तो युनायटेड सिक्कीम क्लबकडून खेळतो. मात्र, दोन वर्षांपूर्वी भूतानमध्ये सिक्कीमच्या एका क्लबकडून खेळताना त्याचा गुडघा टाचेला दुखापत झाली. फुटबॉलमधील त्याचे कौशल्य पाहून चिनी लीगने त्यास आपल्या संघात खेळण्याचा प्रस्ताव दिला. इतकेच नव्हे तर १५ जानेवारीला त्यास विमानाने चीन जायचे होते. मात्र, ११ जानेवारी २०१३ रोजीच त्यांनी यास नकार दिला. आताही त्याला युरोपीय संघाकडून प्रस्ताव येत राहतात. मात्र, त्याच्यासाठी देशच सर्वप्रथम आहे. प्रसिद्ध फुटबॉलपटू वाइचुंग भूतियाच्या क्लबमधून संदेश खेळतो आणि त्यास पितृतूल्य मानतो. तो म्हणतो, वाइचुंग यांनी मला फुटबॉलपटूच्या रूपात घडवले. व्यावसायिक फुटबॉलपटू म्हणून त्यांनीच मला पहिली संधी दिली आणि करारही केला. त्यांनी माझ्यासाठी जे केले ते आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही, असे संदेश म्हणतो. चार भावंडांमध्ये सर्वात लहान असलेला संदेश त्याचा आत्मविश्वास वाढवण्याचे सर्व श्रेय मोठा भाऊ सहज याला देतो.

दुखापतीनंतर सहजमुळेच मी तंदुरुस्त होऊ शकलो, असे संदेश सांगतो. सहज हा क्रिकेटपटू असून राज्य संघटनेकडून तो खेळतो. सहजपेक्षा लहान आणि संदेशपेक्षा मोठे असलेले सौरभ आणि सूर्या ही भावंडंही फुटबॉलच खेळतात. सध्या संदेश हा सचिन तेंडुलकरच्या मालकीच्या केरला ब्लास्टर्स या संघाकडून खेळतो. संदेश सांगतो, आमच्या काळात इंटरनेट नव्हते. त्यामुळे मैदानावर प्रत्यक्ष जाऊन खेळण्याची संधी मिळाली, यासाठी मी स्वत:ला भाग्यशाली समजतो. आता घरी जाण्याची जास्त संधीच मिळत नाही, असेही तो सांगतो.
जन्म- २१ जुलै १९९३
शिक्षण- सेंट स्टीफन कॉलेजची पदवी
चर्चेचे कारण- कोट्यधीश क्लबमध्ये सामील देशातील पहिल्या फुटबॉलपटूचा त्याला नुकताच बहुमान मिळाला.
बातम्या आणखी आहेत...