आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sandip Deshmukh Artical On Poetic Sammelan At Marathi Sahitya Sammelan

चल ना मला आजोबांकडे घेऊन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
समाजातील हरवलेल्या मूल्यव्यवस्थांच्या जाणिवा जपणा-या कवितांनी संमेलनातील रविवारची सकाळ ख-या अर्थाने जागवली. मुख्य सभामंडपात ज्येष्ठ कवयित्री नीरजा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निमंत्रित कवींचे कविसंमेलन रंगले. एकाहून एक सरस कवितांचा रतीब समोर पडत होता आणि रसिकही त्याला मनमुराद दाद देत होते.
नांदेड जिल्ह्याच्या किनवटहून आलेल्या विनायक पवारच्या कवितेने तर संमेलनाचा कळसच गाठला. त्यांच्या आजोबा या कवितेला रसिकांनी विशेष दाद दिली. वन्समोअर मिळवणा-या या कवितेत पवार यांनी आजोबा आणि नातवातील हळव्या नातेसंबंधाचे मनोज्ञ दर्शन घडवले.
उद्या परवा सुटी आहे, पटकन येऊ जाऊन
मम्मी, मला चल ना गं आजोबांकडे घेऊन...
हीच आपली दिवाळी समज, जाणं आणि येणं
सिमेंटमध्ये रुतून बसलंय त्या गावचं बेणं...
असं कोणतं झाड नसतं जे मुळ्या टाकतं खाऊन
मम्मी, मला चल ना गं आजोबांकडे घेऊन...
बीडहून आलेल्या कवयित्री तृप्ती अंधारे यांच्या रचनेलाही उत्स्फूर्त दाद मिळाली.
शाईने द्यावेत स्वत:चे रंग पाण्याला
तसे देत जा तुझ्या दु:खाचे सप्तरंग
तुझ्या पापणीतील आसवांना
अलगद उतरून घेईन माझ्या डोळ्यांच्या पालखीत
अन् मिरवत राहीन आयुष्यभर
तुझ्यासाठी हसत हसत करता येईल मला
हा बाईकडून आईकडेचा प्रवास
रसिकांच्या भावनेला हात घालणा-या या कवितेनंतर परभणी येथील महेश मोरे या कवीच्या शेतक-यांची हालाखी मांडणा-या कवितेने वातावरण भारावून गेले. औरंगाबाद येथील विष्णू सुरासे यांच्या खुमासदार वात्रटिकांनीही संमेलनात रंग भरले. औरंगाबादचेच कवी डी. बी. जगत्पुरिया यांच्या विज्ञाननिष्ठा जागवणा-या गेय कवितेनेही रसिकांचे प्रबोधन केले. मातीची महती वर्णन करताना अमरावती येथील शोभा रोकडे म्हणतात,
दिव्यासाठी स्वत:ला भाजून घेते माती
काठ होऊन नदीला सावरते,
माठ होऊन तृष्णाही भागवते
याच मातीचे गान नाशिक येथील किशोर पाठक यांच्याही कवितेत उमटले.
आली आली वयात आता तिचा भरा भांग
नांगरटीवर कोरून गेली नाव कुणाचं सांग
ही पाठक यांची कविता भावस्पर्शी ठरली.
जळगाव येथील कवयित्री सुशीला पगारिया यांचीही कविता वाखणण्याजोगी होती. याशिवाय शेती व्यवस्थेतील वेदना प्रखरपणे व्यक्त झाली ती गोव्याचे कवी दयानंद पडलोसकर यांच्या रचनेतून. ते म्हणतात,
कालच ओसरीवरच्या खुंटीवर लोंबकळणारी
पांढरीशुभ्र टोपी बापाची आणि
एकमेव मळकट सदरा घेऊन
वडिलधा-या भावानं शेतात बुजगावणं उभं केलं
ते पाहून माझ्या मनाला वाटलं
मरूनही...
बापानं माझ्या शेतात पेरा करायचा सोडला नाही
याशिवाय भोपाळहून आलेल्या सुषमा ठाकूर, मंदा गंधे या दोघींच्याही कविता सरस ठरल्या. इंदूरच्या कवयित्री शोभा तेलंग यांच्या गझलेने वाहवा मिळवली. अकोला येथील प्रशांत असनारे यांची कविताही भावून गेली.
गावसंस्कृतीच्या -हासाचा पट उलगडताना इस्लामपूरचे कवी एकनाथ पाटील यांनी...
उजाड शेतं आणि उद्ध्वस्त गाव सोडून
तुझ्या नापिक आयुष्याशी नळ तोडून
तुझी पोरं परागंदा होताहेत शहरात
आता तुझ्या उजाड गावाचं काय करायचं
असा जळजळीत सवालच व्यवस्थेपुढे मांडला.
कवी