आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sandip Parolekar Story About Eco Ganesh Idol, Ganesh Festival

गणपती बाप्पा मोरयाऽऽऽ, भक्तांमध्ये \'फ्रेंडली\' होत आहेत \'इको फ्रेंडली गणेश मूर्ती\'!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वघ्या दोन दिवसांनी म्हणजेच शुक्रवारी (29 ऑगस्ट) आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात जय्यत तयारी सुरू झाली आहे. लहान-मोठी गणेश मूर्तींचे दुकाने बाजारात सजली आहेत. मूर्तीकार श्रींच्या मूर्तीवरून अखेरचा हात फिरवताना दिसत आहेत तर उल्लेखनिय म्हणजे यंदा 'इको फ्रेंडली (पर्यावरणाशी सुसंगत) गणेश मूर्तीची मागणी वाढली आहे.

पर्यावरणाला घातक असलेल्या व पाण्यात न विरघळणाऱ्या पीओपीच्या अर्थात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीला पर्याय म्हणून कागदी लगदा, शाडू माती व नैसर्गिक साधनसामुग्रीचा वापर तयार झालेल्या 'इको फ्रेन्डली' गणेश मूर्तीला भक्त प्राधान्य देत आहेत. गणेश मूर्ती रंगविण्यासाठी रासायनिक रंगांचा वापर न करता हळद मिश्रीत अष्टगंधाचा वापर करून रंगछटा तयार करण्‍यात आल्या आहेत. त्यामुळे शंभर टक्के 'इको फ्रेन्डली' गणपती तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे मंगलमूर्ती कला केंद्राचे संचालक आणि मूर्तीकार प्रमोद डवले यांनी 'दिव्य मराठी ऑनलाइन'ला सांगितले.

औरंगाबाद शहराजवळ कुठलीही मोठी नदी नसल्यामुळे 'श्री'च्या मूर्तींचे विसर्जन करायचे तरी कुठे? हा प्रश्न सध्या अनेक पर्यावरण प्रेमींना पडला आहे. परिणामी 'श्री'च्या मूर्ती विसर्जन तलाव तसेच विहिरीत केले जाते. मात्र, मूर्तीची विटंबना होतेच यासोबत मोठे प्रदुषण होते. परंतु 'इको फ्रेंडली'मूर्ती या घरामध्ये बादलीतही विसर्जन करता येतात व ते पाणी घरातील कुंड्यांमधील झाडांना वापरता येते. पर्यावरणाची हानी होत नाही.
औरंगाबादेतील उल्कानगरीतील मंगलमूर्ती कला केंद्रात वर्षभर शाहू मातीच्या मूर्ती मिळतात. केंद्राचे संचालक प्रमोद डवले हे स्वत: मूर्तीकार आहेत. त्यामुळे मूर्तीचे कलाकुसर व अचुक रंगसंगतीच्या गणेश मूर्ती ते वर्षभर साकारत असतात. होतकरू मुलांना प्रशिक्षण देतात. इको फ्रेंडली गणेश मूर्तीसोबत पर्यावरणाचे महत्त्व पटवून सांगतात.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, जनजागृतीतून वाढत आहे पर्यावरण प्रेम...