आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघर्ष मनीषसिंह रावlचा: दोन ऑलिम्पिक विजेत्यांना मागे टाकले, पण तरीही...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जन्म : मे१९९१
चर्चेतका ? : त्याचेरिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक थोडक्यात हुकले.
बद्रीनाथ प्रसिद्ध तीर्थस्थळ आहे. मनीषसिंह रावत तेथीलच. १० वर्षांचा असताना २००२ मध्ये वडिलांचा मृत्यू झाला. आई मनीषसह चार मुलांच्या उदरनिर्वाहासाठी शेतात काम करत होती. सात किमी दूर पायी शाळेत जाण्याआधी मनीषही आईसोबत शेतात काम करत होता.

चमोली जिल्ह्यातील सत्तारमध्ये त्यांचे वडिलोपार्जित घर आहे. आईच्या मदतीसाठी मनीषने तेथे एका हॉटेलमध्ये वेटरची नोकरी केली. या नोकरीत घर चालत होते. घरात दोन बहिणी आणि एक लहान भाऊ. त्या वेळी खेळाडू झालास तर सरकारी नोकरी मिळेल, असे कोणीतरी सांगितले. मनीषने रेस वॉकिंग हा खेळ निवडला. त्याला दररोज पहाडी रस्त्याने जावे लागायचेच. रेस वॉकिंगमध्ये एका विशिष्ट शैलीत चालावे लागते. त्याच्या चालण्याच्या शैलीला बद्रीनाथचे लोक हसत असत. पैसे कमावण्यासाठी कुणाच्या घरी नोकर, कधी गाइड, तर कधी लोकांच्या शेतात काम करणे किंवा ट्रॅक्टर चालवणे. पोलिस खात्यात नोकरीसाठी प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला. तू जे करत आहेस त्यातून इतिहास घडवशील, असे प्रशिक्षक त्याला सांगत असत.

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये आयएएफ रेस वॉकिंग चॅलेंजमध्ये त्याने पदक पटकावले. त्यानंतर बीजिंगमध्ये जागतिक स्पर्धेत पुन्हा नशिबाने साथ दिली. तेथेच ऑलिम्पिकचे दार उघडले.

त्याचे प्रशिक्षक आहेत अलेक्झांडर अरटसिबाशेव. त्यांनी त्याला उटीत इतर खेळाडूंसोबत घडवले. रिओ ऑलिम्पिकमध्येही मनीषने चार विश्वविजेते, आशियाई विजेते, युरोपियन विजेते आणि ऑलिम्पिक विजेत्यांना मागे टाकले होते, पण तो मिनिट मागे पडला. त्याच्यासोबत चालणारे गुरमीतसिंह आणि कृष्णन गणपती या इतर दोन भारतीयांना इशारा देऊन हटवण्यात आले. तुझ्या दोन्ही पायांचा नियमानुसार जमिनीशी संपर्क होत नाही, असा इशारा मनीषलाही एकदा मिळाला होता, पण त्याने दुसऱ्यांदा तक्रारीची संधी दिली नाही.
बातम्या आणखी आहेत...