Home | Divya Marathi Special | sanjay nirupam politics career

भविष्यावर नजर ठेवून संजय निरूपमांची राजकीय हुशारी

दिव्य मराठी नेटवर्क - मुंबई | Update - Jun 03, 2011, 05:40 PM IST

बाबा ब्रिगेड म्हणजेच राहुल गांधींच्या सेनेचे विश्वासू नेते मिलिंद देवरा यांचे नाव सध्या कृपाशंकर सिंहांच्या पर्यायासाठी घेतले जात आहे.

  • sanjay nirupam politics career

    बाबा ब्रिगेड म्हणजेच राहुल गांधींच्या सेनेचे विश्वासू नेते मिलिंद देवरा यांचे नाव सध्या कृपाशंकर सिंहांच्या पर्यायासाठी घेतले जात आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा कृपांकडून देवरांकडे सोपवण्याची चर्चा सुरू होताच मिलिंद देवरांच्या नावाला संजय निरूपम यांनी पहिल्यांदा पाठिंबा दर्शवला. बाकीचे काँग्रेस नेते कृपांच्या एकदम विरोधात उभे राहायचे की नाही यावर विचार करत आहेत, तिथे निरूपम यांनी थेट देवरांच्या बाजून वक्तव्य केले आहे.

    संजय निरूपम यांची यामागील हुशारीही दिसून येते आहे. जर राहुल गांधी मेहेरबान झाले तर देवरांना हे पद मिळेल. मात्र, जर निर्णय बदलला तर त्यांना कमीत कमीत देवरांकडून भविष्यात कोणतेही राजकीय नुकसान झेलावे लागणार नाही. निरूपम यांची आणखी एक खेळी इथे स्पष्ट होते. मिलिंद देवरांना पाठिंबा दिल्याने त्यांचे वडील मुरली देवराही खुश आहेत आणि राज्यात मिलिंद देवराही. असेही कृपाशंकर ङ्क्षसह हे त्यांच्यासाठी जास्त फायद्याचे नाहीत. कारण कृपाशंकर सिंहांचं राजकारण महाराष्ट्रापुरतं मर्यादित आहे, तर संजय निरूपम यांचे दिल्लीशी संबंध आहेत. अशातच संजय निरूपम यांनी हिंमत एकवटली आणि ते देवरांच्या बाजूने उभे राहिले. आता याचा फायदा त्यांना कोणत्या स्वरूपात मिळतो हे येणाऱ्या काळात पाहायचे आहे.

Trending