आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्वीच्या शहांपेक्षा सलमानची संपत्ती ५० पट कमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सौदी अरबच्या नवे शहा सलमानची व्यक्तिगत संपत्ती १२० कोटी सौदी रियाल (~ १९७४ कोटी) आहे. यापूर्वीचे किंग अब्दुल्ला यांची एकूण संपत्ती २१ बिलियन डॉलर्स (~ १.३ लाख कोटी) होती. पूर्वीच्या शहाच्या तुलनेत सलमान यांची संपत्ती केवळ २ % आहे. सौदी अरबयाच्या शाही कुटुंबाची एकूण संपत्ती आणि त्याच्या चर्चित किश्श्यांच्या मानाने सलमान यांच्याकडे फारच कमी संपत्ती आहे. ७० च्या दशकात किंग सलमान यांनी विविध कंपन्यांमधील स्वत:ची भागीदारी आपल्या मुलांच्या नावे केली असल्याने हा आकडा कमी झाला आहे. सौदी अरबचे राजपद मिळाल्यानंतर किंग सलमान कधीही कोणत्या कंपनीत शेअर होल्डर राहिले नाहीत, अशा बातम्या प्रसारित करण्यात आल्या.

जेएनयू येथील विशेषज्ज्ञ शरफ सबरी लिखित ‘द हाउस ऑफ सऊद इन कॉमर्स : अ स्टडी ऑन रॉयल आंत्रप्रेन्योरशिप इन सौदी अरेबिया ’ या पुस्तकात याच्या विपरीत लिहिले आहे. यानुसार सातव्या दशकापर्यंत किंग सलमान जनरल मोटर सौदी अरब, सौदी मेरीटाइम ट्रान्सपोर्ट कंपनी तसेच इतर कंपन्यांमध्ये भागीदार होते. त्यानंतर यापैकी काही कंपन्या बंद झाल्या. काही भागीदारी किंग सलमान यांच्या मुलांमध्ये वाटण्यात आली. या कुटुंबाचे प्रमुख सलमान आहेत. कुटुंबाची एकूण संपत्ती १.४ ट्रिलियन डॉलर्स (~ ८६ लाख कोटी)आहे. ही संपत्ती भारताचा जीडीपी २ ट्रिलियन डॉलर्स (~ १२३ लाख कोटी)च्या ७० % आहे. शाही परिवाराचे तीन सदस्य, अल-वालिद बिन तलाल (२० बिलियन डॉलर्स), सुलतान बिन अल अजिज (१० बिलियन डॉलर्स) आणि खालिद बिन सुलतान (२ बिलियन डॉलर्स) यांची नावे जगातील अब्जाधीशांमध्ये सामील आहेत.

तेल उद्योगावर सलमानच्या मुलांचे अधिराज्य : किंग सलमानच्या मुलांची संपत्तीही खूप जास्त आहे. ते अनेक कंपन्यांमध्ये शेअर होल्डर आहेत. देशाच्या तेल उद्योगावरही त्यांचे वर्चस्व आहे. किंग सलमानचे पुत्र प्रिन्स फैसल यांना वर्ष २००४ चे सौदी अरबमधील सर्वश्रेष्ठ उद्योजक म्हणून गौरवण्यात आले. त्यांचे दुसरे पुत्र मोहंमद बिन सलमान संरक्षणमंत्री आहेत. प्रिन्स तुर्की हे सौदी रिसर्च अँड मार्केटिंग ग्रुप (एसआरएमजी)चे अध्यक्ष आहेत. प्रिन्स अब्दुल अजिज ऑइल मिनिस्टर, प्रिन्स सुलतान टुरिझम अ‍ॅथॉरिटीचे प्रमुख असून अनेक कंपन्यांचे शेअर होल्डर आहेत. सलमान यांचे तीन पुत्र सौदी रिसर्च अँड मार्केटिंग ग्रुपचे प्रमुख आहेत. या समूहाचे वृत्तपत्र व मासिके प्रकाशित होतात. यात लंडन येथील दैनिक अशरफ अल अवसातही सामील आहे. विविध कंपन्यांमध्ये यांची भागीदारी १० ते ६० % आहे.

शाही कुटुंबाचे औद्योगिक हित :
सौदी अरबमधील बहुतांश कंपन्यांमध्ये शाही सदस्यांची भागीदारी आहे. अरब देशांमधील ५०० मोठ्या कंपन्यांपैकी ११३ कंपन्या सौदी अरबमध्ये आहेत. यातील ७० % पेक्षा जास्त भागीदारी शाही कुटुंबाची आहे. यात पेट्रोकेमिकल, टेलिकॉम, ऊर्जानिर्मिती, बँकिंग, अन्न उत्पादन उद्योग, गुंतवणूक, रिअल इस्टेट, हॉटेल अँड टुरिझम इत्यादी क्षेत्रांचा समावेश आहे. सौदीतील शेअर बाजार ‘तदावुल’च्या यादीतील १६९ कंपन्यांच्या वरिष्ठ पदांवर शाही कुटुंबीय आहेत. यात शाही कुटुंबातील तिसरी व चौथी पिढीही कार्यरत आहे. सौदी अरबमधील बहुतांश उद्योजक शाही कुटुंबातील सदस्याला भागीदार बनवतात.

- सातव्या दशकानंतर किंग सलमानने औद्योगिक क्षेत्रातून अंग काढून घेतले. त्यानंतर त्यांनी जगातील बलशाली नेत्यांशी नाते दृढ करण्याकडे लक्ष केंद्रित केले. रियाधचे गर्व्हनरपद स्वीकारून त्यांनी परदेशी मित्रांच्या संख्येत चांगली वाढ केली. त्यांचे मन फार विशाल आहे, अशी ख्याती आहे. राजपद ग्रहण करताच त्यांनी पाणी, विजेवर सबसिडी व कर्मचार्‍यांसाठी बोनसची घोषणा केली.

कुटुंब सदस्य वाढल्याने अब्जाधीशांत घट
तेल उत्पादनाचा प्रमुख हिस्सा शाही कुटुंबाला मिळत असला तरी शाही कुटुंबातील अब्जाधीशांची संख्या गेल्या २५ वर्षांत वाढली नाही. गैर शाही अब्जाधीशांची संख्या मात्र वाढली आहे. कुटुंबाची व त्या प्रमाणात कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढल्याने असे होत आहे.