आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सीबीआय तपासामुळे घोटाळे कधीही थांबणार नाहीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


गेल्या वर्षी टेट्रा ट्रक घोटाळा चर्चेत होता. या वर्षाची सुरुवात हेलिकॉप्टर खरेदीत लाचखोरीच्या आरोपांनी झाली. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या मते, 2004 नंतर संरक्षण खात्यातील 39 करारांचा तपास सीबीआयवर सोपवण्यात आला. एकाही दोषीला शिक्षा झाली नाही. बोफोर्ससह इतर प्रकरणांमध्येही तपास संस्था अपयशी ठरल्या. घोटाळ्यांचा परिणाम संरक्षण खरेदीवर अवश्य झाला. दारूगोळा संपत आहे, हे सांगण्यासाठी माजी लष्करप्रमुखाला पत्र लिहावे लागले. नवा घोटाळा समोर आल्यामुळे सरकारने खरेदी प्रक्रिया पुन्हा बासनात गुंडाळली आहे. पण यामुळे घोटाळे थांबतील का?

गरजा वाढल्या, परावलंबन वाढले- संरक्षणावरील खर्च सतत वाढत आहे. इन्फर्मेशन हँडलिंग सर्व्हिसनुसार 2020 पर्यंत संरक्षण खर्चात भारताचा जगात चौथा क्रमांक लागेल. सध्या 70 टक्के गरजा विदेशी कंपन्यांकडून भागवल्या जात आहेत. मोठ्या बाजारपेठेत करार करण्यासाठी विदेशी कंपन्या घोटाळे आणि लाचखोरीला खतपाणी घालत आहेत. अनेक विदेशी कंपन्यांनी तर माजी लष्करी अधिका-याना सल्लागारपदी नेमले असून त्यांच्यामार्फत करार केले जातात.

उत्पादन केल्यास भ्रष्टाचार हटेल : बोफोर्स प्रकरण उघडकीस आल्यानंतर भारताने ही कंपनी ब्लॅक लिस्टमध्ये टाकली. पण हे तंत्रज्ञान मिळाले असते तर अशा हजारो तोफा बनवता आल्या असत्या. भारताने संरक्षण साहित्याचे उत्पादन कधी गांभीर्याने घेतलेच नाही. यावरून असे दिसते की, संरक्षणावरील खर्चापैकी फक्त 6 टक्केच संशोधनावर खर्च होतात. अमेरिका आणि चीनच्या तुलनेत तो खूप कमी आहे. स्वदेशी योजना रखडणे ही मोठी चिंतेची बाब आहे. खुद्द संरक्षणमंत्री ए. के. अँटोनी यांनी ‘तेजस’ या पहिल्या स्वदेशी हेलिकॉप्टरसाठी होणा-या विलंबावरून शास्त्रज्ञांना फटकारले होते.